'सीआयडी' (CID) ही अनेक वर्ष घराघरात पाहिली जाणारी मालिका आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या मालिकेने खिळवून ठेवलं होतं. यातल्या भूमिका खूप गाजल्या होत्या. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत, फ्रेंडी अशा काही पात्रांची नावं येतातच. तसंच यातले डायलॉगही अनेकजण आजही बोलत असतात. नुकताच 'सीआयडी' चा दुसरा सीझन सुरु झाला आहे आणि त्यालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. सीआयडी मध्ये असा एक कलाकार आहे ज्याने एकेकाळी केवळ २० रुपये मानधन घेत काम केलं आहे. आज तोच कोटींचा मालक आहे. कोण आहे तो कलाकार?
'कुछ तो गडबड है दया' हा लोकप्रिय डायलॉग ज्यांचा आहे ते अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) मराठी, हिंदी कलाविश्वातले दिग्गज कलाकार आहेत. शिवाजी साटम यांनी मराठी नाटक, सिनेमे केले. नंतर सीआयडी मालिकेतून त्यांना एसीपी प्रद्युम्न ही ओळख मिळाली. १९८५ साली त्यांना एका मित्राने त्यांची ओळख निर्माते बीपी सिंह यांच्याशी करुन दिली. त्यांच्यात एक क्राइम शो करायचाय अशी चर्चा झाली. तब्बल ६ वर्षआंनंतर १९९२ साली सीआयडीचा पायलट एपिसोड रिलीज झाला. सुरुवातील शिवाजी साटम थिएटर करत सीआयडीचंही शूट करायचे. १९९८ मध्ये सीआयडी सुरु झालं आणि प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं.
२० ते ३० रुपये मानधन
शिवाजी साटम यांनी मराठी थिएटरमधून करिअरला सुरुवात केली होती.प्रत्येक प्रयोगाचे त्यांना केवळ २० ते ३० रुपयेच मिळायचे. थिएटरचं काम पाहून त्यांना बँकेत नोकरीची ऑफर आली. घर चालवण्यासाठी त्यांनी शाळेत शिकवण्याचंही काम केलं. त्यांचा पहिला हिंदी सिनेमा 'पेस्टनजी' १९८८ साली रिलीज झाला होता. यात त्यांनी अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह आणि शबाना आजमी यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमातून त्यांना ५०० रुपयांचं मानधन मिळालं.