Join us

अभिनेता शशांक केतकर सांगतोय प्रेमाच्या आंबट गोड मुरांब्याची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 14:04 IST

Shashank Ketkar:अभिनेता शशांक केतकर लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा (Muramba Serial) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मुरांबा या शीर्षकाप्रमाणेच एक छान आंबट-गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही एक कौटुंबिक गोष्ट आहे. नात्यांमधले ऋणानुंबध त्यातील गुंत्यावर भाष्य करणारी गोष्ट आहे. जवळपास दीड वर्षांनंतर लव्हस्टोरी घेऊन भेटीला येतोय, असे शशांक सांगतो. मुरांबा ही मालिका १४ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेतील भूमिकेबद्दल शशांक केतकर म्हणाला की, अक्षय मुकादम असे मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. आईवर जीवापाड प्रेम करणारा आणि आजीच्या धाकाखाली वाढलेला असा हा अक्षय. अक्षयला नाती जपायला आवडतात. शशांक आणि अक्षय या दोघांमधलं साम्य असं ती म्हणजे खवय्येगिरी. स्वयंपाक घरात नवनवे प्रयोग करायला मला आवडतात. मालिकेत देखिल माझं स्वयंपाक घराशी जवळचं नातं असणार आहे. 

या मालिकेत शशांक केतकर रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. त्याबद्दल तो म्हणाला की, मी बऱ्याच दिवसांपासून रोमॅण्टिक भूमिकेची वाट पहात होतो. भूमिकेच्या बाबतीत तुम्ही कितीही वेगळा प्रयोग करायला गेलात तरी लव्हस्टोरीची गोष्टच वेगळी आहे. प्रेक्षकांना लव्हस्टोरी आपलीशी वाटते. मालिकेच्या नावाप्रमाणेच एक आंबट-गोड लव्हस्टोरी आहे. मुरांबा ज्याप्रमाणे मुरला की त्याची चव वाढते अगदी त्याचप्रमाणे मालिकेत नाती मुरताना तुम्ही अनुभवाल. स्टार प्रवाहवसोबत जवळपास ८ वर्षांनंतर काम करतोय. स्टार प्रवाह नंबर वन वाहिनी आहे. त्यामुळे या वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना खूप मजा येतेय.

टॅग्स :शशांक केतकर