मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकताच अभिनेता संग्राम समेळ लग्नाच्याबेडीत अडकला आहे. संग्रामच्या लग्नाचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आहेत. इचलकरंजीला हा लग्न सोहळ पार पडला. दोघे वधू आणि वराच्या जोड्यात खूपच सुंदर दिसत होते. संग्रामची पत्नी श्रद्धा फाटक डान्सर आहे. तिचे डान्सचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. संग्रामचे हे दुसरं लग्न आहे. 2016मध्ये संग्रामचं पल्लवी पाटीलसोबत लग्न झाले होते मात्र काही कारणामुळे दोघे वेगळे झाले.
दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला अभिनेता संग्राम समेळ, जाणून घ्या त्याच्या पत्नीबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 18:10 IST