Join us

आई स्मिता पाटीलच्या घरीच का बांधली लग्नगाठ? प्रतीक बब्बरने सांगितलं भावुक कारण, म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 11:55 IST

प्रतीक बब्बरने गर्लफ्रेंडसोबत काल व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर आई स्मिता पाटीलच्या घरी लग्नगाठ बांधली (pratik babbar)

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलचा (smita patil) लेक प्रतीक बब्बरने  (pratik babbar) काल व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत थाटामाटात लग्न केलं. प्रतीकच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यांचं कमेंट्स करुन अभिनंदन केलं. प्रतीक बब्बरने लग्नासाठी एक विशेष गोष्ट केली. ती म्हणजे आई स्मिता पाटीलच्या घरीच प्रतीकने लग्नाचं आयोजन केलं. इतकंच नव्हे तर लग्नाला वडील राज बब्बर यांनाच निमंत्रण नाही दिलंं. यामागचं कारण काय? याविषयी प्रतीकने खुलासा केला.

प्रतीकने आई स्मिता पाटीलच्या घरी केलं लग्नसोहळ्याचं आयोजन

वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रतीक बब्बरने मनातल्या भावना व्यक्त केल्या. याशिवाय लग्नसोहळ्यासाठी जी जागा निवडली होती,  त्यामागचं भावनिक कारणही सांगितलं. म्हणाला, "आम्हाला एका घरातलं लग्न हवं होतं. माझ्या आईने ज्या ठिकाणी पहिलं घर खरेदी केलं होतं त्या ठिकाणी आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा माझा निर्णय होता. आईच्या आत्म्याला सन्मान देण्याचा याहून चांगला मार्ग दुसरा कोणताच नव्हता." अशाप्रकारे प्रतीकने आईच्या घरी लग्न करण्यामागचं भावुक कारण सांगितलं.

लग्नसोहळ्यासाठी कुटुंबाला नाही दिलं प्रतीकने निमंत्रण

गेल्या काही महिन्यांपासून स्मिता पाटीलचा लेक प्रतीकचे त्याच्या कुटुंबियांसोबत चांगले संबंध नाहीत. प्रतीकने त्याच्या कुटुंबियांना दूर केलंय, त्यामुळे सर्वांनाच या गोष्टीचा खूप त्रास होतोय, असा खुलासा प्रतीकचा भाऊ आर्य बब्बरने केला. त्यामुळेच लग्नसोहळ्यात प्रतीकने त्याचे वडील राज बब्बर आणि इतरांना आमंत्रण दिलं नाही. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. परंतु प्रतीक त्याच्या निर्णयावर ठाम होता. प्रतीकची पत्नी प्रिया बॅनर्जी सुद्धा अभिनेत्री आहे. दोघं गेली ४ वर्ष एकमेकांना डेट करत आहेत.

टॅग्स :प्रतीक बब्बरस्मिता पाटील