Join us

अभिनेता प्रथमेश परबच्या या सिनेमावर प्रेक्षक झाले खूश, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 13:54 IST

चपखल विनोदबुद्धी आणि अभिनयाच्या जोरावर आपला एक वेगळा चाहतावर्ग बनवणारा अभिनेता प्रथमेश परब सध्या चर्चेत आहे.

चपखल विनोदबुद्धी आणि अभिनयाच्या जोरावर आपला एक वेगळा चाहतावर्ग बनवणारा अभिनेता प्रथमेश परब सध्या त्याच्या एक नंबर कामगिरीमुळे चर्चेत आहे. मिलिंद कवडे दिग्दर्शित 'एक नंबर' हा सिनेमा  सिनेमागृहात नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा कमाल प्रतिसाद मिळत आहे. साचेबद्ध भुमिकेतून बाहेर पडत प्रथमेशने आपल्या अभिनयाची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर मांडली आहे.

समाजातील अत्यंत महत्वाचा विषय विनोदी चष्म्यातून दाखवण्याचा प्रयत्न यात केला आहे. किशोरवयीन प्रेम, आणि रोम-कॉम जॉनरच्या पलीकडे जाऊन, प्रथमेशने यांत तरुणांसाठी एक वेगळाच दृष्टीकोन मांडला आहे. एक नंबर या सिनेमाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता प्रथमेशचा हा प्रयत्न काहीप्रमाणात यशस्वी देखील झाला असल्याचं पहायला मिळत आहे.   

याव्यतिरिक्त प्रथमेशचे आणखीन काही सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. ज्यात ढिश्क्यांव, टकाटक २, लव सुलभ, होय महाराजा या सिनेमांचा समावेश आहे, यासोबतच 'दृश्यम २' च्या चित्रीकरणाला देखील लवकरच सुरूवात होत असल्यामुळे यंदाचे वर्ष प्रथमेशच्या अभिनय कारकीर्द साठी 'एक नंबर' असणार यात शंकाच नाही!

टॅग्स :प्रथमेश परब