Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता मुकेश तिवारी दिसणार नव्या अवतारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 06:00 IST

मुकेश तिवारी 'बँड बाजा बंद दरवाजा' मालिकेत एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्दे'बँड बाजा बंद दरवाजा' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला'बँड बाजा बंद दरवाजा' मालिकेत मुकेश तिवारी दिसणार भूताच्या भूमिकेत

सोनी सब नवीन मालिका 'बँड बाजा बंद दरवाजा'सह २०१९ची सुरुवात धुमधडाक्‍यात करण्‍यास सज्‍ज आहे. मुकेश तिवारी अभिनीत ही हॉरर कॉमेडी मालिका प्रेक्षकांना भूतिया ट्विस्‍टसह रोलर कोस्‍टरवर घेऊन जाणार आहे. चित्रपटांतील आपल्‍या सर्वोत्‍तम अभिनयासाठी ओळखला जाणारा हा अभिनेता एका नवीन अवतारामध्‍ये दिसणार आहे. तो संजीव शर्मा नामक भूताच्या भूमिकेत दिसणार आहे.

'बँड बाजा बंद दरवाजा' ही संजीव शर्माची कथा आहे. तो २५ वर्षांनंतर त्‍याच्‍या पूर्ण होऊ न शकलेल्‍या प्रेमिकेच्‍या जीवनामध्‍ये भूत बनून परत येतो. संजीवचे सरिता नावाच्‍या मुलीसोबत विवाह होणार असतो, पण ती तिचा प्रेमी चंदन खुरानासोबत पळून जाते. तो याच गोष्‍टीचा बदला घेण्‍यासाठी परत येतो आणि त्‍यांच्‍या मुलाला त्रास देऊ लागतो. संजीवचा विवाह न झाल्‍याने तो एकाकी जीवन जगतो. त्‍याची इच्‍छा असते की, सरिता व चंदनचा मुलगा रॉकीने देखील त्‍याच्‍यासारखेच जीवन जगावे.या भूमिकेबाबत मुकेश तिवारी म्‍हणाला, 'मी सोनी सबवरील मालिका 'बँड बाजा बंद दरवाजा'मध्‍ये हॉरर-कॉमेडी शैली सादर करण्‍यास खूपच उत्‍सुक आहे. एक अभिनेता म्‍हणून मी विविध शैलींच्‍या भूमिका साकारण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. म्‍हणूनच ही मालिका स्‍वीकारताना मी अधिक विचार केला नाही. मी या नवीन विनोदी मालिकेसह दर्शकांचे मनोरंजन करण्‍यास उत्‍सुक आहे.'मुकेश तिवारी भूताच्या भूमिकेतून रसिकांना भुरळ पाडेल का, हे पाहणे कमालीचे ठरेल.सर्वोत्‍तम कलाकार व लक्षवेधक पटकथेसह बँड बाजा बंद दरवाजा लवकरच २०१९ मध्‍ये सोनी सबवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

टॅग्स :सोनी सब