Join us
Daily Top 2Weekly Top 5

'प्लीज...छोड दो मेरी बाईक' ट्रॅफिक पोलिसांसमोर हातापाया पडला इशान खट्टर, भरावा लागला 500 रू. दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 15:37 IST

बाईक परत मिळावी म्हणून त्याने पोलिसांकडे खूप रिक्वेस्टही केली.पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी इशानला 500 दंड भरावा लागला.    

शाहिद कपूरचा धाकटा भाऊ इशान खट्टरने 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  ब-याच दिवसापासून चर्चेत नसलेला इशान आता एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.  इशानने ट्रॅफिक नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करत 500 रू. दंड आकारला होता.  त्याचे झाले असे की, इशानने त्याची बाईक नो पार्किंग झोनमध्ये लावली होती. वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये  तो गेला होता. त्याचवेळी त्याने त्याची बाईक चुकीच्या ठिकाणी पार्क केली होती. रेस्टॉरंट बाहेर पडताच इशानने पाहिले की, पोलिस त्याच्या बाईकला टो करत आहेत. हे पाहून तो धावत पोलिसांकडे गेला. बाईक परत मिळावी म्हणून त्याने पोलिसांकडे खूप रिक्वेस्टही केली.पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी इशानला 500 दंड भरावा लागला.    

असाच किस्सा 'लव आजकल 2' च्या शूटिंगवेळी सारा अली खानबरोबरही घडला होता. विना हेल्मेट तिने बाईक राईड केली होती. तिचा तो व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. विना हेल्मेट बाईकचा आनंद लुटत असणा-या साराला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले होते.

टॅग्स :इशान खट्टरसारा अली खान