Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भटच्या बहुचर्चित 'अल्फा'मध्ये झळकणार 'हा' हँडसम अभिनेता, सर्वांची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 12:01 IST

'अल्फा' सिनेमात बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता झळकणार आहे (alpha, alia bhatt)

'अल्फा' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. आलिया भटची प्रमुख असलेला 'अल्फा' सिनेमा घोषणेपासूनच चर्चेत आहे. 'अल्फा' सिनेमात आलियासोबतच शर्वरी वाघही प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमात अभिनेता कोण झळकणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर याविषयी एक मोठी बातमी समोर आलीय. यशराज पिक्चरच्या आगामी 'अल्फा' सिनेमात बॉलिवूडमधील हा लोकप्रिय अभिनेता विशेष भूमिका साकारणार असल्याची दाट शक्यता निर्माण झालीय.

हा लोकप्रिय अभिनेता साकारणार 'अल्फा'मध्ये भूमिका

यशराज फिल्मसच्या आगामी स्पाय युनिव्हर्समध्ये आता महिला स्पाय सहभागी होणार आहेत. यामध्ये आलिया भट आणि शर्वरी वाघ प्रमुख भूमिकेत आहेत. आता या दोघींच्या जोडीला हृतिक रोशन सहभागी होणार आहे. हृतिक रोशन 'वॉर' सिनेमात कबीरच्या भूमिकेत या स्पाय युनिव्हर्समध्ये सहभागी झाला. आता हृतिक पुन्हा एकदा कबीरच्या भूमिकेत आलिया-शर्वरीच्या 'अल्फा'मध्ये झळकणार आहे. 

आलिया-शर्वरीचा 'अल्फा' कधी रिलीज होणार?

बॉलिवूडची सुपरस्टार आलिया भट्ट आदित्य चोप्राच्या YRF स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या फीमेल लीड सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत 'मुंज्या' फेम अभिनेत्री शर्वरी वाघही आहे. YRF च्या आदित्य चोप्रा यांनी स्पाय युनिव्हर्समधील 'अल्फा गर्ल्स' म्हणून या दोघींच्या सिनेमाला प्रेझेंट केलंय. केवळ पुरुष नाही तर महिलाही अल्फा असू शकतात, असा एक वेगळा संदेश 'अल्फा'मधून देण्यात येणार आहे. आता या दोघींसोबत हृतिक रोशन 'अल्फा'मध्ये दिसला तर ती मोठी पर्वणी असेल यात शंका नाही. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

टॅग्स :आलिया भटहृतिक रोशन