Join us

लोकप्रिय अभिनेत्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क, आगामी सिनेमातला लूक व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:25 IST

प्रसिद्ध अभिनेत्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांना चांगलाच धक्का बसलाय. जाणून घ्या

कलाकार एखाद्या भूमिकेसाठी किती मेहनत करतात हे आपल्या सर्वांना माहितच आहे. कधी कुस्तीपटू साकारण्यासाठी आमिर खान, सलमान खानने वजन वाढवल्याचं आपल्याला माहित आहे. तर कधी सरबजीत सारख्या भूमिकेसाठी रणदीप हूडाने त्याचं वजन कमी केल्याचं सर्वांना माहितच आहे. सध्या मनोरंजन विश्वात अशाच एका अभिनेत्याची चर्चा आहे ज्याने एका भूमिकेसाठी वजन इतकं घटवलंय की तो हाडांचा सापळा दिसतोय. हा अभिनेता आणि सिनेमा कोणता? जाणून घ्या.

28 इयर्स लेटर सिनेमातील अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण

नेटकऱ्यांना काल एक जबरदस्त धक्का बसला. जेव्हा '28 इयर्स लेटर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. रहस्यमयी थ्रिलर असलेल्या या ट्रेलरने सिनेमाच्या विषयाचा अंदाज लावणं कठीण आहे. परंतु ट्रेलरमध्ये एका अभिनेत्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. हा अभिनेता म्हणजे सिलियन मर्फी. 'पिकी ब्लेंडर्स', 'ओपनहायमर' अशा सिनेमांमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फीच्या आगामी '28 इयर्स लेटर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये अभिनेता इतका बारीक झालाय की अक्षरशः तो हाडांचा सापळा दिसतोय. सिलियनला अशा लूकमध्ये पाहिल्यावर त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसलाय.

कधी रिलीज होणार हा सिनेमा?

सिलिनय मर्फी हा अभिनेता त्याच्या हॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. १९९० पासून अभिनेता मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. सिलियन मर्फीचा आगामी '28 इयर्स लेटर' हा सिनेमा २० जून २०२५ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सिलिनय मर्फी या सिनेमात एका झोंबीची भूमिका साकारणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. आता सिनेमा रिलीज होईल तेव्हा '28 इयर्स लेटर'मध्ये सिलियन मर्फीचा अभिनय पाहून चाहते निश्चितच थक्क होतील यात शंका नाही.

टॅग्स :हॉलिवूड