Join us

अभिनेता चिन्मय उद्गीरकरची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, लग्नाचे हे फोटो तुम्ही कधी पाहिलेत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 08:00 IST

चिन्मय सध्या अग्गंबाई सूनबाई मालिकेत झळकत आहे. मालिकेतल्या त्याच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळत आहे. याआधीही त्याने मालिका आणि सिनेमात भूमिक साकारत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

छोटा पडदा असो किंवा मग किंवा मोठा पडदा कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात  काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे  चिन्मय उद्गीरकर आणि अभिनेत्री गिरीजा जोशी.

2015 साली गिरीजा आणि चिन्मय रेशीमगाठीत अडकत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला होता. या लग्नसोहळ्याला  कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.

लग्नात नववधू गिरीजा सगळ्यांचे आकर्षण होती. फारच सुंदर ती दिसत होती. पिवळ्या रंगाची आणि हिरवे काठ असलेली नऊवारी साडी, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात लक्ष्मीहार आणि मोत्याचे दागिने घालून गिरीजा जोशी सजली होती. तर चिन्मय उदगीरकरने गडद जांभळ्या रंगाचा सूट घातला होता. या फोटोंमध्ये नववधू गिरीजा जोशीचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती या फोटोत पाहायला मिळतेय. 

गिरीजा जोशीनेही सिनेमात काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गिरीजा जोशीने 'प्रियतमा' या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने 'देऊळ बंद', 'वाजलीच पाहिजे' या सिनेमांमध्ये काम करत रसिकांची पसंती मिळवली होती. वाजलाच पाहिजे-गेम की शिणेमा’ या सिनेमात चिन्मय आणि गिरीजा यांनी एकत्र काम केल आहे.

चिन्मय सध्या अग्गंबाई सूनबाई मालिकेत झळकत आहे. मालिकेतल्या त्याच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळत आहे. याआधीही त्याने मालिका आणि सिनेमात भूमिक साकारत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

टॅग्स :चिन्मय उद्गगिरकर