Join us

 रात्ररात्र रडायची आयुषमानची पत्नी, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 15:46 IST

काही महिन्यांपूर्वी ताहिरा ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. पण ताहिराने धैर्याने या आजाराचा सामना केला.

ठळक मुद्देताहिरा एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे.

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. याचदरम्यान आयुषमानची पत्नी व फिल्म मेकर ताहिरा कश्यप हिने एक वेगळाच खुलासा केला आहे. काही महिन्यांपूर्वी ताहिरा ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. पण ताहिराने धैर्याने या आजाराचा सामना केला. कॅन्सरशी सुरु असलेली लढाई जिंकलेल्या ताहिराने नुकतीच ‘मिड डे’ला मुलाखत दिली. यावेळी मानसिक आरोग्यावर ती बोलली. काही वर्षांपूर्वीचा अनुभव तिने शेअर केला.

‘शरीर, आत्मा आणि मेंदू यांना मी कधीच एक समजले नाही. मी कायम शारीरिक आरोग्यावर लक्ष दिले. जणू मानसिक आरोग्य असे काही नसतेच, असे मी वागले. जिममध्ये मी तासन् तास घाम गाळला. पण मानसिक स्वास्थ्यासाठी मात्र मी काहीही केले नाही. कदाचित त्या दिवसांत मी डॉक्टरकडे गेले असते तर त्यांनी मला डिप्रेस्ड घोषीत केले असते. पण मी त्याऐवजी रडण्याचा पर्याय निवडला. मी दुहेरी आयुष्य जगत होते. माझा पती शूटींगवर असायचा आणि मी रात्रभर रडत राहायचे. सकाळी उठल्यानंतर मात्र सगळ्यांसमोर पुन्हा तोच आनंदी चेहरा घेऊन वावरायचे.   माझ्या मुलांना मी लूजर वाटू नये, अशी माझी धडपड असायची. माझ्या मते, माझ्या आतील निगेटीव्हीटीमुळे मला कॅन्सर झाला,’ असे ताहिराने सांगितले.

या स्थितीतून ताहिरा कशी सावरली हेही तिने सांगितले. मी विपश्यना सुरु केली आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत केले, तेव्हा कुठे हळूहळू सगळे ठीक व्हायला लागले. कॅन्सरचे निदान झाल्यावर मी खंबीरपणे या आजाराचा सामना करू शकले, ते त्याचमुळे. अगदी सुरुवातीच्या स्टेजवर मला कॅन्सर असल्याचे कळले आणि त्यामुळे उपचार लवकर सुरु झालेत, असेही ती म्हणाली.

ताहिरा एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे कॅन्सरचे निदान झाले होते. ताहिराच्या या कठिण काळात आयुष्यमान कायम तिची सपोर्ट सिस्टिम बनून राहिला.

टॅग्स :आयुषमान खुराणाताहिरा कश्यप