Join us
Daily Top 2Weekly Top 5

 अभिनेता अनिकेत विश्वासरावची सासूबाई देखील आहेत अभिनेत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 08:00 IST

वय केवळ एक आकडा आहे, असं म्हणतात. अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिची आई आणि अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या सासूबाईंनी मात्र हे सिद्ध करून दाखवलं आहे.

ठळक मुद्देमेरे साई मालिकेमुळे त्यांना अभिनयाची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोनं केलं.

मराठी सृष्टीतील चॉकलेट हिरो अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao).  ये रे ये रे पैसा, फक्त लढ म्हणा, लपून छपून, बस स्टॉप, पोश्टर गर्ल, आंधळी कोशिंबीर, पोश्टर बॉईज सारख्या अनेक चित्रपटांत अनिकेत झळकला. ऊन पाऊस, कळत नकळत मालिकेतूनही तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. 2018 साली अनिकेतने अभिनेत्री स्रेहा चव्हाणसोबत (Sneha Chavan) लग्नगाठ बांधली.  हे जोडपं आनंदात नांदतेय. पण आज आम्ही अनिकेत वा स्नेहाबद्दल नाही तर अनिकेतच्या सासूबाई आणि स्रेहाच्या आईबद्दल सांगणार आहोत.

अनिकेतची पत्नी स्रेहा अभिनेत्री आहे. अनेक मालिका व सिनेमात तिने काम केलेय. स्रेहाची आई राधिका चव्हाण ही सुद्धा एक अभिनेत्री आहे. अलीकडे सोनी टीव्ही वरील ‘मेरे साई’ या हिंदी मालिकेत त्या झळकल्या. ही त्यांची पहिली टीव्ही मालिका ठरली.

राधिका सोशल मीडियावर चांगल्याच अ‍ॅक्टिव्ह आहेत. इन्स्टावरचे त्याचे डान्स व्हिडीओ बघण्यासारखे आहेत. राधिका चव्हाण यांची आणखी एक ओळख सांगायची तर त्या केवळ अभिनेत्री नसून कापोर्रेट क्षेत्रात होस्ट म्हणून काम करत आहेत. अनेक राजकीय, कार्पोरेट इव्हेंट त्यांनी होस्ट केले आहेत.  मेरे साई मालिकेमुळे त्यांना अभिनयाची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोनं केलं.

अनिकेत व स्रेहाच्या लग्नासाठी राधिका यांनीच पुढाकार घेतला होता. अनिकेतची मावशी राधिका यांच्याच सोसायटीत राहत होती. या मावशींमार्फत स्रेहासाठी अनिकेतचं स्थळ आलं. यानंतर अगदी दोन्ही कुटुंबानं ठरवून, चर्चा करून दोघांचं लग्न पार पडलं होतं. 

टॅग्स :अनिकेत विश्वासरावस्नेहा चव्हाण