अभिनेता अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)ने २००० साली रेफ्युजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटात काम केले. लवकरच त्याचा घुमर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे का, अभिषेक बच्चन एका महाराष्ट्रीय पदार्थाचा खूप मोठा चाहता आहे. हा पदार्थ म्हणजे मिसळ. खुद्द अभिषेकने याबद्दल सांगितले आहे.
अभिषेक बच्चन म्हणाला की, मला मिसळ खूप आवडते. माझ्यासाठी दररोज ठाण्यावरुन मिसळ येते. तेही मामलेदारची. हे हेल्दी फूड आहे. तसेच मला गावठी चिकन खूप आवडते आणि ते आमच्या घरीदेखील बनवले जाते. एवढेच नाही तर मला मिरचीचा ठेचादेखील खूप आवडतो. थंडीच्या दिवसात माझा फ्रेंड हुरडादेखील आणतो.
फिटनेसबद्दल...
बरेच कलाकार फिट राहण्यासाठी एक्सरसाइज आणि डाएट करतात. याबद्दल अभिषेकला विचारले असता त्याने सांगितले की, मी डाएट वगैरे करत नाही. मात्र जर भूमिकेसाठी मला वजन घटवावे लागले तर हे सगळे मी बंद करतो. मग त्यावेळी त्यासाठी जे गरजेचे आहे ते करतो.
आगामी प्रोजेक्ट
अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याचा घूमर चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की करत आहेत. याशिवाय अभिषेक बच्चनची निर्मिती असलेला चित्रपट ट्रिपल एस 7च्या पोस्ट प्रोडक्शनचे सध्या काम सुरू आहे. शूट पूर्ण झाले आहे आणि यात तोदेखील काम करताना दिसणार आहे.