Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेक-ऐश्वर्याची लाडकी लेक आराध्या बच्चनचा नवा हेअरकट चर्चेत, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 12:48 IST

Aaradhya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. आराध्या बऱ्याचदा आई ऐश्वर्यासोबत स्पॉट होते.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. आराध्या बऱ्याचदा आई ऐश्वर्यासोबत स्पॉट होते. आराध्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. त्याचबरोबर तिच्या हेअरस्टाइलमुळे ती नेहमीच ट्रोल होत असते. पण यावेळी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये आराध्याची हेअर स्टाइल बदललेली पाहायला मिळत आहे.

आराध्या नुकतीच कबड्डी मॅच पाहण्यासाठी तिचे आजोबा अमिताभ बच्चन, आई ऐश्वर्या राय आणि वडील अभिषेक यांच्यासोबत जयपूरला गेली होती. यादरम्यान ती तिचे वडील अभिषेक यांच्या टीम पिंक पँथरला चिअर करताना दिसली. या व्हिडिओत आराध्याच्या हेअरस्टाइलकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.ती तिची आई ऐश्वर्यासोबत बसलेली दिसत आहे. यावेळी आराध्या तिच्या वडिलांच्या टीमला चिअर करताना दिसली. या व्हिडिओमध्ये तिची हेअर स्टाइलही बदलेली दिसली. तिचा हा लूक सध्या चर्चेत आला आहे.

आराध्या हेअरकटमुळे झाली होती ट्रोलआराध्या बच्चन नेहमीच बेबी कट हेअर स्टाइलमध्ये दिसली आहे. तिच्या हेअरकटमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नुकताच आराध्याच्या स्कूल फंक्शनचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात पहिल्यांदा ती वेगळ्या हेअर स्टाइलमध्ये दिसली होती.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअमिताभ बच्चनअभिषेक बच्चन