Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिज्ञा भावेने साजरी केली पहिली मंगळागौर, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 13:12 IST

अभिनेत्री अभिज्ञा भावे जानेवारी, २०२१ मध्ये मेहुल पैसोबत विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर तिची पहिली मंगळागौर साजरी करण्यात आली.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अभिज्ञा भावे जानेवारी, २०२१ मध्ये मेहुल पैसोबत विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर यंदा तिची पहिली मंगळागौर साजरी करण्यात आली. मंगळागौरचा व्हिडीओ तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो व्हायरल होताना दिसत आहे.

अभिज्ञा भावे हिने तिची पहिली मंगळागौर साजरी केली आणि तिने मंगळागौरचे खेळ खेळतानाचे व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत सगळे वेगवेगळे पारंपारिक खेळ खेळताना दिसत आहेत. तिच्या या मंगळागौरला मराठी चित्रपटसृष्टीतील तिच्या मैत्रिणी रेश्मा शिंदे आणि अनुजा साठेने हजेरी लावली होती. अभिज्ञा भावेच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. 

अभिज्ञा भावेने या वर्षी जानेवारी महिन्यात मेहुल पै याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. तिच्या पतीचे नाव मेहूल पै आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा आहे आणि गेल्या १२ वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तिथे तो इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी सांभाळतो आहे.

अभिज्ञा भावे सध्या कलर्स वाहिनीवरील बावरा दिल या हिंदी मालिकेत पहायला मिळते आहे. या मालिकेत ती जान्हवीची भूमिका साकारते आहे. याआधी २०१०मध्ये तिने ‘प्यार की ये एक कहाणी’ या हिंदी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिने अनेक मराठी मालिकांमध्येही काम केले आहे.

टॅग्स :अभिज्ञा भावे