Join us
Daily Top 2Weekly Top 5

असं केलं होतं मधुराला अभिजीतने प्रपोज, म्हणाली, "दुपारी दीड वाजता वरळी सीफेसवर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 16:31 IST

मधुराने अभिजीतसह नुकतीच लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या शोमध्ये हजेरी लावली होती.

ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप वेलणकर यांची लेक मधुरा वेलणकरही नावाजलेली अभिनेत्री आहे. हापूस, एक डाव धोबीपछाड, गोजिरी अशा काही सिनेमांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मराठी मालिकांमध्येही तिने अभिनयाचा ठसा उमटवला. मधुराचं माहेर आणि सासर दोन्हीही मनोरंजनससृष्टीशी निगडित आहे. तिचे वडील तर अभिनेते आहेतच शिवाय तिचे सासरे हे सीआयडी फेम अभिनेते शिवाजी साटम आहे. त्यांचा मोठा मुलगा अभिजीत साटमशी तिने लग्नगाठ बांधली आहे.'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने अभिजीतनं तिला कसं प्रपोज केलं याचा खुलासा केला. 

मधुरा म्हणाली, ''आमचं फोनवर बोलणं झालं होतं त्या मी त्याला तुझ्याघरी येतेय असं सांगितलं होतं. यावर तो म्हणाला माझ पण एक काम आहे तुझ्याकडे. मी म्हटलं ठिक आहे मी तुझ्या घरी येतेय तेव्हा बोलू आपण. तो म्हणाला, घरी नको शिवाजी मंदिराला भेटू मी म्हटलं ओके. तुझ्या घरी जाईन आणि मग मी शिवाजी मंदिरा येईन. याच्या घरी गेले मुलाखत झाली आणि मी घेणार तेव्हा हा घरी आला. मला असं वाटलं की आता हा मला शिवाजी मंदिराला भेटणं अपेक्षित आहे, हा घरी काय आला म्हटलं कदाचित एकत्र जायचं असेल तर हा घरी आला आणि तो आता गेला निघून. माझी निघायची वेळ झाली.'' 

''मला काही कळेना याला भेटायचं आहे की नाही. म्हटलं जाऊ देत याला गरजचं आहे आपल्याला काय करायचं आहे आपण जाऊया. मी निघाले तेव्हा बरोबर हा बाहेर आला. मला पप्पांनी विचारलं तू कुठे चालली आहेस. मी म्हटलं शिवाजी मंदिरला अरे अभिजीत जरा सोड तिला. याला माहिती होतं पप्पा हे सांगणार. म्हणून तो आता गेला मी उठल्या क्षणी  बाहेर आला. मग आम्ही याच्या गाडीने निघालो. दुपारी दीड वाजता वरळी सीफेसवर मी ओढणी घेऊन गॉगल लावून बसले होते. याने मला एक मुलगी अशी आहे, रुपारेल मध्ये  philosophy शिकतंय असं सगळं सांगत होता. माझ्यावरचं आलं हे. मग आम्ही तासभर गप्पा मारल्या. मग आम्ही भेटायला लागलो आणि नंतर आमची मैत्री झाली, असं ही मधुरानं सांगितलं. 

टॅग्स :मधुरा वेलणकर