Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुला पाहते रे...! लग्नाच्या रिसेप्शनमध्ये रोमॅन्टिक झाली अभिज्ञा भावे, पाहा, ‘त्या’ क्षणाचा सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 12:51 IST

फोटो अगदीच खास...

ठळक मुद्देअभिज्ञाबद्दल सांगायचे तर तिला सर्वच ओळखतात. मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात अभिज्ञा भावेचा मोठा चाहतावर्ग आहे.  

‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री अभिज्ञा भावे नुकतीच लग्नबंधनात अडकली. मुंबईच्या मेहुल पै याच्यासोबत अभिज्ञाने लग्नगाठ बांधली. अगदी जवळच्याच लोकांच्या उपस्थितीत अभिज्ञा व मेहुलचा शाही विवाहसोहळा पार पडला आणि यानंतर सुंदर रिसेप्शन सोहळाही संपन्न झाला. या रिसेप्शनचे फोटो अगदीच खास आहेत. यात अभिज्ञा व मेहुल एकमेकांत हरवलेत. दोघांचे हे रोमॅन्टिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिज्ञाने स्वत: हे रोमॅन्टिक फोटो तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. यातला एक फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. यात अभिज्ञा मेहुलच्या गालावर हलकेच चुंबन देत आहे.

दुस-या एका फोटोत अभिज्ञा व मेहुल एकमेकांत हरवलेत. मेहुल अभिज्ञाचा हात हातात घेत, तिच्या डोळ्यांत बघतोय.

तिस-या फोटोत अभिज्ञा मेहुलकडे पाहून खळखळून हसतेय. तिचे बोलके डोळे खूप काही सांगताहेत.

चौथा फोटोत या नवविवाहित कपलवर फुलांचा वर्षाव होतोय. यातही दोघांची रोमॅन्टिक केमिस्ट्री स्पष्ट दिसतेय. ऑक्टोबरमध्ये अभिज्ञा व मेहूलचा साखरपुडा झाला होता.अभिज्ञाने ‘माझा साखरकारखाना’असे कॅप्शन देत साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते.  

अभिज्ञाचा पती मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

शुभ मंगल सावधान..! अभिज्ञा भावे मेहुल पैसोबत अडकली विवाह बंधनात, व्हिडीओ आणि फोटो आले समोर

अभिज्ञाबद्दल सांगायचे तर तिला सर्वच ओळखतात. मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात अभिज्ञा भावेचा मोठा चाहतावर्ग आहे.   सध्या ती ‘रंग माझा वेगळा’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसून येत आहे. त्या आधी तिने खुलता कळी खुलेना, लगोरी, प्यार की एक कहानी अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अभिज्ञा अभिनय क्षेत्रात येण्याआधी एअर हॉस्टेस होती.

टॅग्स :अभिज्ञा भावे