Join us

Aashram 3: 'तो काळ माझ्यासाठी खूप...'; बाबा निरालासोबतच्या इंटिमेट सीनवर इशाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 14:52 IST

Aashram 3: या सीरिजमध्ये पहिल्यांदाच इशा आणि बॉबी यांचे इंटिमेट सीन पाहायला मिळाले.

प्रकाश झा (Prakash Jha) दिग्दर्शित 'आश्रम ३'(Aashram 3) ही सीरिज नुकतीच एमएक्स प्लेअरवर रिलीज झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक या सीरिजच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. या सीरिजमध्ये अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) याने बाबा निराला ही मुख्य भूमिका साकारली असून अभिनेत्री इशा गुप्ताने (Esha Gupta) त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये पहिल्यांदाच इशा आणि बॉबी यांचे इंटिमेट सीन पाहायला मिळाले. या सीनची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. अनेकांनी या सीनवर संमिश्र प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता पहिल्यांदाच इशाने बॉबीसोबत दिलेल्या या सीनवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

काही दिवसांपूर्वीच इशाने 'बॉलिवूड लाइफ'ला मुलाखत दिली. यावेळी इंटीमेट सीन देताना तिची कशी अवस्था झाली होती याविषयी तिने भाष्य केलं. "असे सीन देताना कम्फर्टेबल होणं वा न होणं हा विचार आम्ही फारसा करत नाही. ज्यावेळी तुम्ही कलाविश्वात १० वर्षांचा काळ घालवता त्यावेळी असे इंटीमेट सीन देताना तुम्हाला फारसं कठीण जात नाही. लोकांना पडद्यावर हे सीन पाहताना फार मोठं काही तरी विचित्र घडत असल्याचं वाटतं. मात्र, प्रत्यक्षात तसं नसतं. या बाबतीत आम्ही मुक्त विचारांचे आहोत", असं इशा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "खरं तर पडद्यावर इमोशनल सीन करणं सगळ्यात जास्त कठीण असते. ज्यावेळी मी पहिल्यांदा इंटिमेट सीन दिला त्यावेळी तो काळ माझ्यासाठी खऱंच कठीण होता. पण, आता तसं काही वाटत नाही. ज्यावेळी तुम्ही सुज्ञ आणि चांगल्या कलाकारांसोबत काम करता त्यावेळी तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. मला असं वाटतं आता जे सीन चित्रपटांमध्ये दाखवले जातात तसे अद्यापही ओटीटीवर दाखवले जात नाहीत. आणि, हो बॉबी देओल यांनीही यापूर्वी काही इंटिमेट सीन दिलेले असणार त्यामुळे त्यांनाही  हे सीन देताना फार अडचण आली नसावी. ज्यावेळी तुम्ही असे सीन पडद्यावर दाखवता त्यावेळी प्रेक्षकांनी तो सीन फिल केला पाहिजे. मग तो रोमॅण्टिक सीन असो वा प्रेमाचा. त्यामुळे आम्ही जे सीन केले ते समाधानकारक आहेत."

दरम्यान, 'आश्रम ३' मध्ये इशा गुप्ताने एका बिल्डरची भूमिका साकारली आहे. सोनिया असं तिच्या भूमिकेचं नाव असून ती तिच्या स्वार्थासाठी बाबा निराला याला भुलवण्याचा प्रयत्न करते. या सीरिजमध्ये इशाने बोल्ड आणि ग्रे शेडची भूमिका केली आहे. 

टॅग्स :इशा गुप्तावेबसीरिजसेलिब्रिटीबॉबी देओल