Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आशिकी 3' चं गाणं लीक, चाहत्यांना आली अंकित तिवारीची आठवण, म्हणाले, 'अरिजीतला ब्रेक...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 13:03 IST

सोशल मीडियावर अरिजीत सिंहच्या फॅन पेजवर एक गाणं लीक झालं आहे

राहुल रॉय (Rahul Roy)  आणि अनु अग्रवाल (Anu Agrawal) यांचा सुपरहिट 'आशिकी' (Aashiqui) सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं. त्यानंतर 2013 साली याचाच सिक्वल आला. यामध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. 'आशिकी 2' (Aashiqui 2) सुद्धा सुपरहिट झाला आणि काही दिवसांपूर्वीच 'आशिकी 3' (Aashiqui 3) ची घोषणा झाली. यामध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aryan) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान 'आशिकी 3'मधील अरिजीत सिंहच्या (Arijit Singh) आवाजातील गाणं लीक झालं आहे.

सोशल मीडियावर अरिजीत सिंहच्या फॅन पेजवर एक गाणं लीक झालं आहे. हा 'आशिकी 3' मधला ऑडिओ असल्याचा दावा पेजने केला आहे. 'वो जो तेरा हाल था कभी, वो जो तेरा प्यार था कभी...भूल जा!'  असे गाण्याचे बोल आहेत. हे ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. तसंच या गाण्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अरिजीतचा हा ऑडिओ ऐकून त्याच्या चाहत्यांनी तर कौतुकच केलंय. मात्र काही जणांना गायक तिवारीची आठवण झाली आहे. 'आशिकी 2'मध्ये अंकित तिवारीने गाणी गायली होती जी आजही लोकांच्या तोंडावर आहेत. 'अरिजीतला जरा ब्रेक द्या, अंकित तिवारीला आणा' अशी कमेंट एकाने केली आहे. 'आशिकी 3'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी यावेळी अनुराग बसूंवर आहे. तर भूषण कुमार आणि महेश भट निर्माते आहेत. 'अब तेरे बिन जी लेंगे हम...'या गाण्याच्या टीजरसह 'आशिकी 3' सिनेमाची घोषणा केली गेली होती. 

कार्तिक आर्यन 'आशिकी 3'मध्ये मुख्य अभिनेता असून मुख्य अभिनेत्री कोण असणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. मध्यंतरी दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांची नावं समोर आली होती. मात्र निर्माते मुकेश भट्ट यांनी या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं. तसंच सारा अली खानचंही नाव आघाडीवर होतं मात्र मला फिल्म ऑफरच झाली नाही असं तिने स्पष्ट केलं.

टॅग्स :अरिजीत सिंहअंकित तिवारीकार्तिक आर्यन