Join us

आमिर खानच्या मुलीने शेअर केला असा फोटो, तर नेटकरीही तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 16:16 IST

इरा खानच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, इरा खान ही बॉलिवूडमधील पदार्पणाच्या चर्चेत आहे. इरा दिग्दर्शित नाटकाचे नाव ‘युरिपिड्स मेडिया’ असे आहे.

सोशल मीडियावर कलाकार असो किंवा मग स्टारकिडस सगळेच खूप अॅक्टीव्ह असतात. यांत सतत अॅक्टीव्ह असणारी आमिर खानची मुलगी इरा खान तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. आता पुन्हा एक फोटो इराने शेअर केला आहे.या फोटोत तिच्या ग्लॅमरस तितकाच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी रसिकांनी खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे. काळ्या रंगाच्या हॉट पँट आणि टॉपमध्ये इराच्या  कॅमे-यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा चाहत्यांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.अगदी त्याचप्रमाणे इराचीही एक वेगळी स्टाइल आहे.त्यामुळे तिच्या या ग्लॅमरस लूकची चाहत्यांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळते आहे. तसेच या फोटोत ती कसल्या तरी विचारात रमल्याचे भाव तिच्या चेह-यावर उमटले आहेत. पाचगणी येथे हा फोटो क्लिक केला आहे. निवांत क्षणा अशा रितीने कॅप्चर करत तिने इतरांनाही प्रेरणा दिली असल्याचे प्रतिक्रीया उमटत आहे.

इरा खानच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, इरा खान ही बॉलिवूडमधील पदार्पणाच्या चर्चेत आहे. इरा दिग्दर्शित नाटकाचे नाव ‘युरिपिड्स मेडिया’ असे आहे. या नाटकाच्या मुख्य भूमिकेत इराने युवराज सिंहच्या पत्नीला घेतले आहे. इराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे. अलीकडे आमिरने याबद्दल माहिती दिली होती. मुलगी इराला फिल्ममेकिंगमध्ये आणि मुलगा जुनैद याला अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता. त्यानुसार इराने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

टॅग्स :आमिर खानइरा खान