Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानच्या लेकीने केले अतरंगी फोटोशूट, फोटो पाहताच म्हणाल - OMG!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 06:00 IST

आमिर खानची लेक इरा खान सोशल मीडियावर सतत चर्चेत येत असते.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खान सोशल मीडियावर सतत चर्चेत येत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण न करताच या अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. ती तिचा बॉयफ्रेंड मिशान कृपलानीसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली होती. मात्र आता ती एका अतरंगी फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

आमिर खानची मुलगी इरा खानचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इराचा अतरंगी अंदाज सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तिने नुकतेच अतरंगी फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती प्रिंटेड गाऊनमध्ये दिसते आहे. तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

इतर बॉलिवूड किड्ससारखे आमिर खानची मुलगी इरा खान हिला अभिनयात नाही तर दिग्दर्शनात करियर करायचं आहे. त्यासाठी तिने पूर्ण तयारीदेखील केली आहे. 

इरा खानच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, इरा खान ही बॉलिवूडमधील पदार्पणाच्या चर्चेत आहे. इरा दिग्दर्शित नाटकाचे नाव ‘युरिपिड्स मेडिया’ असे आहे. या नाटकाच्या मुख्य भूमिकेत इराने युवराज सिंहच्या पत्नीला घेतले आहे. इराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे. अलीकडे आमिरने याबद्दल माहिती दिली होती.

मुलगी इराला फिल्ममेकिंगमध्ये आणि मुलगा जुनैद याला अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता. त्यानुसार इराने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. 

टॅग्स :इरा खानआमिर खान