Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमध्ये आमिर खानच्या सहकलाकारावर आली रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ, व्हिडिओ होतोय व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 11:31 IST

लॉकडाऊनमध्ये मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग बंद असल्यामुळे या अभिनेत्यावर पोट भरण्यासाठी भाजी विकण्याची वेळ आली आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तसेच देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत कित्येक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्व कामकाज बंद असल्यामुळे काहींवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक अभिनेता रस्त्यावर गाडीवरुन भाजी विकत असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग बंद असल्यामुळे या अभिनेत्यावर पोट भरण्यासाठी भाजी विकण्याची वेळ आली आहे.

बिग बॉस' फेम डॉली बिंद्रा हिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिनेता जावेद हैदर हातगाडीवर भाजी विकताना दिसतो आहे. जावेदने आमिर खानसोबत 'गुलाम' या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. मात्र, जावेद हैदर याचीही परिस्थिती साधारण अशीच आहे. डॉली बिंद्राने शेअर केलेल्या या व्हिडिओत जावेद हैदर हातगाडीवर भाजी विकताना दिसतो आहे. या व्हिडिओत जावेदने 'दुनिया में जीना है तो...' या गाण्यावर लिप्सिंगही केले आहे. या व्हिडिओमुळे जावेद हैदरसारख्या सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जावेदने २००९ साली आलेल्या 'बाबर' चित्रपटात काम केले होते. याशिवाय त्याने जेनी और जुजू या मालिकेतही काम केले आहे. बालकलाकार म्हणून जावेदने इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती. 

टॅग्स :आमिर खान