Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कीच्या ‘फर्स्ट लेडी’ची भेट आमिर खानला पडली महाग, सोशल मीडियावर झाला जबरदस्त ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 15:16 IST

का ट्रोल झाला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट,जाणून घ्या कारण?

ठळक मुद्देआमिर सध्या ‘लालसिंग चड्ढा’ या सिनेमाच्या शूटींगसाठी तुर्कीमध्ये आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याला एका विदेशी महिलेची भेट चांगलीच महाग पडली. होय, या महिलेसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि हे फोटो पाहताच नेटकरी भडकले. आता तुम्ही म्हणाल ही विदेशी महिला कोण? तर तुर्कीच्या फर्स्ट लेडी अर्थात तुर्कीच्या अध्यक्षांच्या पत्नी.

आमिर सध्या ‘लालसिंग चड्ढा’ या सिनेमाच्या शूटींगसाठी तुर्कीमध्ये आहे. यादरम्यान रविवारी त्याने तुर्कीच्या फर्स्ट लेडी एमीन इर्दोगान यांची भेट घेतली. एमीन यांनी सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर केलेत. ‘भारतीय अभिनेता, निर्माता व दिग्दर्शकाला भेटून मला अत्यानंद झाला. आमिरने आपल्या नव्या सिनेमाच्या शूटींगसाठी तुर्कीची निवड केली, याचाही मला आनंद आहे,’ असे हे फोटो शेअर करताना केले. एकीकडे आमिर खानच्या भेटीने तुर्कीची फर्स्ट लेडी खूश झाली पण नेटकरी मात्र भडकले.

काय आहे कारणतुर्कीची फर्स्ट लेडी आणि आमिरच्या भेटीवर अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली. याचे कारण म्हणजे, तुर्कीचा पाकिस्तानला असलेला पाठींबा. देशात जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवताना त्याचा विरोध करणा-यात तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यीन ईर्दोगान आघाडीवर होते. त्यांनी जाहिरपणे पाकिस्तानला पाठींबा दिला होता. तुर्कस्थानचे अध्यक्ष खुलेआम पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीरवरून होत असणा-या वादात पाकिस्तानची बाजू घेत असतना आमिरने या या अध्यक्षांच्या पत्नीला भेटणे अनेकांना खटकले.  यावरून अनेकांनी आमिरला ट्रोल केले. काहींनी तर आमिरच्या आगामी सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली.आमिर खान भारताचा चांगला मित्र असलेल्या इस्रायलच्या पंतप्रधानांना भेटायला नकार देतो आणि भारताचा शत्रू असलेल्या तुर्कीच्या फर्स्ट लेडीला भेटतो, अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या.

   

टॅग्स :आमिर खान