आमिर खानचा ३१ वर्षीय मुलगा जुनैद खानचा (Junaid Khan) 'लव्हयापा' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. तमिळ सिनेमाचा हा रिमेक आहे. जुनैद खानचा हा दुसरा सिनेमा आहे. 'महाराज' या सिनेमातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र तो सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता. तर आता 'लव्हयापा' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान आमिर खानचा मुलगा असून जुनैद इतका कसा साधा राहतो असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. नुकतंच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने याचं उत्तर दिलं आहे.
जुनैद खानने 'लव्हयापा' निमित्ताने 'लोकमत फिल्मी'शी दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्याला आमिरचा मुलगा असून लोकल ट्रेनने का प्रवास करतो असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जुनैद म्हणाला, "मी याकडे खूप प्रॅक्टिकली पाहतो. आपण मुंबईत राहतो आणि सध्या इथे ठिकठिकाणी रस्त्याचं, मेट्रोचं काम सुरु आहे. म्हणून मी सरळ लोकलने किंवा कधीकधी चालतही जातो. (हसतच)मला कोणी रस्त्यावर त्रासही देत नाही. मी आता जुहू, अंधेरी भागात असेल आणि मला टाऊनला जायचं असेल तर गाडीने कितीतरी वेळ लागू शकतो. म्हणून मी लोकल ट्रेननेच आरामात जातो."
आमिर खानचा मुलगा हीच ओळख! यावर जुनैद म्हणाला, "मला वाटतं प्रेक्षकांसोबत..."
तो पुढे म्हणाला, "आमचं कुटुंब उदारमतवादी आहे. आम्हाला सगळं करायची मोकळीक दिली आहे. आपला मार्ग आपणच शोधायचा आहे अशी शिकवण दिली आहे. सिनेमात यायचं ठरवलं तेव्हाही मी कित्येक ऑडिशन्स दिल्या आणि आजही देतोय. लोकांना माझं काम आवडलं तर ते मला स्वीकारतीलच याची मला खात्री आहे."