Join us

नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटाला आमिर खान जबाबदार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 19:22 IST

कमाल आर खानचंही ट्वीट चर्चेत आलं आहे.आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्यावर बरीच टीका केली होती. आमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतरही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटासाठी एकत्र काम केलं आहे.

गेल्या काही महिन्यांत  साउथ इंडस्ट्रीचे स्टार कपल समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या अनेक चर्चा झाल्या. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेणार असल्याची घोषणा केली. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असूनसुद्धा यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याने चाहत्यांनाही मोठा धक्काच बसला होता. या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण व्हायला कंगना राणौतने थेट मि.परफेक्शनिस्ट आमिर खानलाच जबाबदार धरले. 

समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटासाठी सोशल मीडियावर आमिर खानला जबाबदार धरले जात आहे.सध्या यावर प्रचंड चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. आमिरनेही काही दिवसांपूर्वी पती किरण रावपासून घटस्फोट घेतला होता. त्यावेळी आमिर खान लडाखमध्ये नागा चैतन्यसोबत 'लाल सिंग चड्ढा' या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता. समंथा आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या कारणांबद्दल फार जास्त न बोलणेच पसंत केले.यानंतर सोशल मीडियावर आमिर खानच्या नावाची चर्चा सुरू झाली.

 कमाल आर खानचंही ट्वीट चर्चेत आलं आहे.आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्यावर बरीच टीका केली होती. आमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतरही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटासाठी एकत्र काम केलं आहे. पण केआरके मात्र सातत्याने आमिर खानवर टीका करताना दिसतो. आता त्यानं यात दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यवरही निशाणा साधला आहे. आमिर खान आणि नागा चैतन्य यांच्यासंबंधीत केआरकेनं केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे.तर दुसरीकडे कंगनाच्या या पोस्टवरून तिने घटस्फोटासाठी आमिर खानला जबाबदार धरले आहे. 

टॅग्स :आमिर खानसमांथा अक्कीनेनी