Join us

'सितारे जमीन पर' थिएटरमध्ये नाही तर युट्यूबवर रिलीज होणार? आमिर खानने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "हा सिनेमा..."

By कोमल खांबे | Updated: June 7, 2025 08:30 IST

'सितारे जमीन पर' सिनेमा थिएटरमध्ये नव्हे तर युट्यूबवर रिलीज करण्याचा निर्णय आमिरने घेतल्याचं म्हटलं जात होतं. आता यावर आमिरने थेट उत्तर दिलं आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान 'सितारे जमीन पर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या तारे जमीन पर या लोकप्रिय सिनेमाचा हा सीक्वल असणार आहे. या सिनेमातून दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल टीमची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या मुलांच्या बास्केटबॉल कोचची भूमिका आमिर खान निभावणार आहे. पण, आमिरचा हा सिनेमा थिएटर नव्हे तर युट्यूबवर रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात होतं. 

'सितारे जमीन पर' सिनेमा थिएटरमध्ये नव्हे तर युट्यूबवर रिलीज करण्याचा निर्णय आमिरने घेतल्याचं म्हटलं जात होतं. आता यावर आमिरने थेट उत्तर दिलं आहे. आमिरने 'सितारे जमीन पर' सिनेमाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला. त्याला याबाबत विचारल्यावर तो म्हणाला, "सिनेमा युट्यूबर रिलीज होणार आहे, अशी चर्चा आहे. सितारे जमीन पर थिएटरमध्ये रिलीज न करता डायरेक्ट युट्यूबवर प्रदर्शित होणारे, असंही अनेक ठिकाणी मी वाचलं. पण, या सगळ्या अफवा आहेत. माझा सिनेमा फक्त आणि फक्त थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. मी शेवटपर्यंत माझे सिनेमे फक्त थिएटरमध्येच रिलीज करेन".

‘सितारे जमीन पर’ मध्ये आमिर खान आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय यांचे असून अमिताभ भट्टाचार्य यांनी गाणी लिहिली आहेत. चित्रपटाचे निर्माते आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भगचंदका हे आहेत. २० जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

टॅग्स :आमिर खानजेनेलिया डिसूजा