Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अंडरवर्ल्डची पार्टी अन् आमिर खानने.." निर्माते महावीर जैन यांचा अभिनेत्याबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 09:03 IST

जेव्हा बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचा दबाव होता तेव्हा...

फिल्म 'लाल सिंह चड्डा' फ्लॉप झाल्यानंतर आमिर खान (Aamir Khan) गायबच झाला आहे. आता फिल्म निर्माते महावीर जैन यांनी एक आमिरबाबत एक खुलासा केला आहे. ज्यावेळी बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचा धोका होता तेव्हा आमिर खानने अंडरवर्ल्डशी पंगा घेतला होता. अंडरवर्ल्डच्या पार्टीत जाण्यास आमिरने थेट नकार दिला होता.

'रामसेतू', आणि 'गुड लक जेरी' सारखे सिनेमे बनवणारे निर्माते महावीर जैन यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत आमीर खानची स्तुती केली आहे. ते  म्हणाले, "आमिर नियमांनुसार चालणारा माणूस आहे. 90 च्या दशकात जेव्हा बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचा दबाव होता तेव्हा कलाकारही त्यांच्या तालावर नाचायचे. स्टार्सला अंडरवर्ल्डच्या मिडल ईस्ट मध्ये आयोजित पार्ट्यांमध्ये जाणे अनिवार्य असायचे तेव्हा एकट्या आमीरने पार्टीचं निमंत्रण नाकारलं होतं."

ते पुढे म्हणाले, "सत्यमेव जयते शो दरम्यान काही ब्रँड्सच्या जाहिराती त्याने नाकारल्या होत्या. त्याने सुमारे ३ वर्ष चार ते पाच ब्रँड्सची जाहिरात केलीच नाही ज्याच्या जाहिराती त्याने आधी केल्या होत्या. कारण सत्यमेव जयते हा सिरिअस शो होता, ब्रँड्सच्या जाहिरातींमुळे शोवर परिणाम झाला असता."

लोकांना आमिरबाबत गैरसमज

महावीर जैन म्हणाले, "आमिर खान असा माणूस आहे ज्याला नाव, प्रसिद्धी, पैसे आणि पॉवर सारख्या गोष्टींपासून दूर राहणे आवडते आणि तसेच आयुष्य जगायला आवडते. तो फिल्मस्टार्सच्या शर्यतीतही नसतो. सोशल मीडियावरुन परसेप्शन आणि वास्तविकता दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जे आमिरला वैयक्तिकरित्या ओळखतात ते हेच सांगतील.

टॅग्स :आमिर खानबॉलिवूडगुन्हेगारी जगत