Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खान सहा वर्षांनी परतणार जुन्या घरात, या कारणामुळे घेतला निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 14:34 IST

आमिर आता कार्टर रोडच्या घरातून पाली हिल येथील त्याच्या जुन्या घरी परतणार आहे. 

ठळक मुद्देआमिर खानला गेल्या कित्येक महिन्यांपासून त्याच्या जुन्या घरी शिफ्ट व्हायचे होते. त्यामुळे त्याने त्याच्या जुन्या घराचे रिनोव्हेशन देखील केले आहे. त्यामुळे आता सहा वर्षांनंतर पुन्हा त्याने जुन्या घरी जाण्याचे ठरवले आहे.

आमिर खान गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील कार्टर रोड परिसरात राहात आहे. पण आता त्याने हे घर सोडून त्याच्या जुन्या घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. कार्टर रोडमध्ये त्याने एक दुमजली घर भाड्यावर घेतले होते. पण आता त्याने येथून शिफ्ट व्हायचे ठरवले आहे. तो आता पाली हिल येथील त्याच्या घरी परतणार आहे. 

आमिर खान अनेक वर्षं पाली हिल येथील मरिना अपार्टमेंट्स मध्ये राहात होता. पण त्याने सहा वर्षांपूर्वी कार्टर रोडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सहा वर्षांनंतर आता आमिर पुन्हा जुन्या घरात का जात आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. मिड डे या वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खान सध्या राहात असलेले घर भाडे तत्वावर असून त्याची मुदत संपली आहे आणि त्याने त्याचे नुतनीकरण देखील केलेली नाही. आमिर खानला गेल्या कित्येक महिन्यांपासून त्याच्या जुन्या घरी शिफ्ट व्हायचे होते. त्यामुळे त्याने त्याच्या जुन्या घराचे रिनोव्हेशन देखील केले आहे. त्यामुळे आता सहा वर्षांनंतर पुन्हा त्याने जुन्या घरी जाण्याचे ठरवले आहे. आमिर खानला आपल्या या घराविषयी एक वेगळाच जिव्हाळा असल्याने त्याला तिथेच परत जायचे आहे आणि त्यामुळेच किरण राव स्वतः घराच्या रिनोव्हेशनकडे लक्ष देत आहे. घराची थिम ही निसर्गाशी निगडित असणार आहे. 

 आमिर सध्या लाल सिंग चड्ढा या त्याच्या चित्रपटावर काम करत आहे. हा फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ऑस्कर जिंकला होता. या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाला जगभरात लोकप्रियता मिळाली होती. आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसने ‘फॉरेस्ट गम्प’चे हक्क खरेदी केले असून या चित्रपटात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी आमिरला तब्बल २० किलो वजन कमी करायचे आहे आणि त्यावर सध्या तो मेहनत घेत आहे. 

‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार असून अद्वैतने यापूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

टॅग्स :आमिर खानकिरण राव