Join us

आमिर खानच्या घरात 7 जणांचा रिपोर्ट आला पॉझिटीव्ह, आमिरच्या आईचा रिपोर्ट आला निगेटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 17:37 IST

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या घरातील स्टाफ पैकी एकूण 7 कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या घरातील स्टाफ पैकी एकूण 7 कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते, त्यानंतर घरातील सर्व सदस्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. आमिर खानने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे की त्याच्या आईची टेस्ट निगेटीव्ह आली आहे.

 

आमिर खान म्हणतो, माझी आईची कोरोनाची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. तुम्ही सगळ्यांनी केलेल्या प्रार्थनाबद्दल धन्यवाद. अजून या गोष्टीची माहिती मिळालेली नाही की घरातील इतर सदस्यांच्या टेस्टचे रिपोर्ट कधी समोर येणार. आईची टेस्ट निगेटीव्ह आल्याने आमिर खुश आहे. 

सोमवारी आमिरने, आपल्या स्टाफमधील काही लोकांना कोरोना झाल्याचे त्याने या नोटमध्ये स्पष्ट केले आहे होते. त्याने लिहिले, ‘माझ्या स्टाफमधील काही लोकांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. त्यांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात आले आहे. या सर्वांना योग्य आरोग्य सुविधा मिळावी म्हणून बीएमसीने कमालीची तत्परता दाखवली, त्याबद्दल मी बीएमसीचे खास आभार मानतो. आम्हा उर्वरित सर्वांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. मात्र आता मी माझ्या आईला टेस्टसाठी नेत आहे, ती या साखळीतील शेवटची व्यक्ती आहे. तिची टेस्ट निगेटीव्ह येईल, यासाठी प्रार्थना करा...’

टॅग्स :आमिर खान