Join us

‘थोडी तरी लाज बाळगा...’;  लेकीनं बिकिनीत केलं बर्थ डे सेलिब्रेशन, आमिर खान झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 18:25 IST

Aamir Khan Ira Khan Trolled : आमिर खानची लेक इरा खान सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत असते. पण यावेळी तिच्या फोटोंमुळे तिच्या अब्बाला अर्थात आमिर खानला ट्रोल व्हावं लागलं.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan ) लेक इरा खान (Ira Khan) ही चित्रपटांपासून दूर आहे. पण लाईमलाईटमध्ये राहण्याची कला तिलाही चांगलीच अवगत आहे. सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड फोटो, बॉयफ्रेन्डसोबतचे रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर करत ती सतत चर्चेत असते.सध्याही ती सोशल मीडियावरच्या फोटोंमुळेच चर्चेत आहे. पण यावेळी या फोटोंमुळे तिच्या अब्बाला अर्थात आमिर खानला ट्रोल व्हावं लागलं. होय, इराचे फोटो पाहून लोकांनी आमिरला जबरदस्त ट्रोल केलं.

इराने नुकताच तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला. बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो इराने शेअर केलेत. या फोटोत इराची आई रिना दत्ता, तिचे अब्बा आमिर खान, सावत्र भाऊ आझाद, सावत्र आई किरण राव, इराचा बॉयफ्रेन्ड असे सगळे आहेत. या फोटोत इरा बिकिनीत केक कापताना दिसतेय आणि नेमका हाच फोटो युजर्सला खटकला आहे. 

हा फोटो व्हायरल झाला आणि नेटकरी भडकले. मग काय, इरासोबत आमिरही ट्रोल झाला. हा वाढदिवसाला घालायचा ड्रेस आहे का? असं एका युजरने लिहिलं. काही युजर्सनी आमिरलाही वाईट पद्धतीनं ट्रोल केलं. अरे आमिर, थोडीत तर लाज बाळग, असं एकाने लिहिलं. ही मुलगी किती बेशरम आहे आणि त्याहून जास्त बेशरम बाप आहे, अशा शब्दांत एकाने आमिर व इरा दोघांना ट्रोल केलं.

टॅग्स :आमिर खानइरा खान