Join us

आमिर खानच्या मुलीने जंगलात केले फोटोशूट, पुन्हा एकदा दिसला ग्लॅमरस लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 12:38 IST

इराच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स दिल्या आहेत.

ठळक मुद्देइराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे.

आमिर खानची मुलगी इरा खान सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. इराने जंगलात फोटोशूट केले. या फोटोंमधील इराचा ग्लॅमरस आणि हॉट लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. काही फोटोंमध्ये इरा गोल्डन व ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसतेय. तर काही फोटोंमध्ये तिने मरून गाऊन कॅरी केला आहे. ‘जेव्हा तुमची स्टाइलिश शूटवर येत नाही, तेव्हा तुम्ही तिला मिस करता आणि तिचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करता. यासाठी मुर्खासारखे फोटो काढता, जेणेकरून स्टाइलिश घाबरून चिडेल,’ असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे.

इराच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स दिल्या आहेत. काहींनी इराच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे तर काहींनी इराला ट्रोल केले आहे. ‘कमीत कमी तुझ्या वडिलांच्या प्रतिष्ठेचा तर विचार कर, तुला लाज वाटायला हवी,’ अशा शब्दांत तिला ट्रोल करण्यात आले आहे.

इरा खान सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच स्वत: इराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ती मिशाल कृपलानीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. यानंतर इरा व मिशाल यांचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

इराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे. अलीकडे आमिरने याबद्दल माहिती दिली होती. मुलगी इराला फिल्ममेकिंगमध्ये आणि मुलगा जुनैद याला अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता. त्यानुसार इराने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Euripides Medea हे नाटक ती दिग्दर्शित करणार आहे. या नाटकातून युवराज सिंगची पत्नी हेजल किच अूॅक्टिंगच्या दुनियेत कमबॅक करतेय. 

टॅग्स :इरा खानआमिर खान