Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मला माफ कर..!', एक्स वाइफ रिनाचे पत्र वाचून ढसाढसा रडला होता आमिर खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 15:23 IST

लगानचे शूटिंग संपल्यानंतर त्याची पहिली पत्नी रिनाने पत्र लिहिले होते. ते पत्र वाचून आमिर खानला अश्रू अनावर झाले होते.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र त्यातील लगान चित्रपट त्याच्यासाठी जास्त स्पेशल आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन नुकतेच २० वर्षे झाले आहेत. हा आमिर खानच्या प्रोडक्शनचा पहिला चित्रपट होता. आमिर खान सोबत आशुतोष गोवारीकरने या चित्रपटाची निर्मिती केली होती. लगान चित्रपटाला ऑस्करमध्ये बेस्ट फॉरेन लॅग्वेंज फिल्मचे नामांकनही मिळाले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांच्यातील जवळीक वाढली होती. मात्र आमिर खानने खुलासा केला होता की, त्याच्यासाठी या चित्रपटाशी निगडीत सर्वात सुंदर आठवण त्याची पहिली पत्नी रिना दत्ताचे लेटर होते.

लगान चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाले, तसे तर आमिर खानसाठी या चित्रपटाशी निगडीत प्रत्येक आठवणी स्पेशल आहे. मात्र चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर त्याची पहिली पत्नी रिनाने पत्र लिहिले होते. ते पत्र वाचून त्याला अश्रू अनावर झाले होते. खरेतर या चित्रपटाला वीस वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने आमिर खानने मीडियासोबत बातचीत केली. त्यावेळी आमिर खान म्हणाला की, जर या चित्रपटाशी निगडीत अविस्मरणीय आठवणींबद्दल सांगू तर त्या असंख्य आहेत. मात्र माझ्यासाठी सर्वात स्पेशल आठवण आहे ती म्हणजे माझी पहिली पत्नी रिना. मी तिला एका रात्री म्हटले होते की, तू या चित्रपटाची निर्मिती कर मात्र ती म्हणाली होती की, तिला चित्रपटाच्या मेकिंगबद्दल काहीच माहित नाही आणि हे खरेदेखील होते. तिला याबद्दल काहीच माहित नव्हते. मात्र नंतर तिने माझ्यासाठी प्रोडक्शनची जबाबदारी सांभळली. यासाठी रिनाने विशेष तयारी केली होती. या प्रोजेक्टसाठी तिने प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांची देखील भेट घेतली होती.

लगान पूर्ण झाल्यानंतर रिनाने आमिरला एक पत्र लिहिले होते. त्यात तिने लिहिले होते की, ‘मला माफ कर. या कठीण प्रसंगात चित्रपट पूर्ण करण्यासाठी’. तिने या चित्रपटाशी संबंधित सगळ्यांचे कौतुक केले होते. त्यावर आमिर खानने सांगितले की, आम्ही सगळे मनोरंजन क्षेत्रातील होतो. पण रिनाला अजिबात याची पार्श्वभूमी नव्हती. ते पत्र वाचून मी खूप रडलो होतो.

आमिर खान पुढे म्हणाला की, लगानसाठी रिनाने खूप मेहनत घेतली होती. लगानच्या यशात तिचा देखील खारीचा वाटा आहे. रिनाने मेकिंगच्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. ती खूप स्ट्रिक्ट प्रोड्यूसर होती. ती कुणाचे काही चुकले तर सगळ्यांना ओरडत होती. ती मला देखील सोडत नव्हती.

लगानच्या शूटिंगदरम्यान आमिर खान आणि किरण राव यांच्यातील जवळीक वाढली होती. त्यानंतर आमिर खानने आपली पहिली पत्नी रिनाला घटस्फोट दिला आणि किरण राव सोबत लग्न केले होते.

टॅग्स :आमिर खानकिरण रावआशुतोष गोवारिकर