Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानला या अभिनेत्रीसोबत किसिंग सीन शूट करताना फुटला होता घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 08:00 IST

आमिर खानचा हा किसिंगचा हा किस्सा खूप चर्चेत आला होता.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान प्रत्येक चित्रपट व भूमिकेसाठी जी-तोड मेहनत घेत असतो. आमिर स्वत:च अभिनयाला विशेष महत्त्व देत असल्यामुळे त्याच्या चित्रपटात हॉट सीन्स अपवादाने पहायला मिळतात. मात्र ज्या काही चित्रपटांमध्ये त्याने किसिंग सीन दिले आहेत, ते करताना त्याला अक्षरश: घाम फुटला होता, असे खुलासे समोर येत आहेत.

‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल’, ‘इश्क’, ‘मन’, ‘रंग दे बसंती’, ‘थ्री इडियट’ या चित्रपटांमध्ये आमिरने लिप लॉक सीन्स दिले आहेत. मात्र फारसे किसिंग सीन न देणाऱ्या आमिरच्या चित्रपटांचे किस्से बऱ्याचदा ऐकायला मिळतात. तसाच अभिनेत्री पूजा बेदी हिने आमिरच्या किसिंग सीन्सविषयी केलेला खुलासा धक्कादायक आहे. कारण तिच्या मते हे सीन्स देताना आमिरची हालत प्रचंड खराब झाली होती. त्याला अक्षरक्ष: घाम फुटला होता. जेव्हा जेव्हा त्याने अशाप्रकारचे सीन्स दिले तेव्हा तेव्हा त्याने सेटवरून पळ काढला होता.

एका मुलाखतीदररम्यान पूजा बेदीने म्हटले की, ‘आतंक ही आंतक’ या चित्रपटात जेव्हा आमिर खानने माझ्यासोबत लिप्स किसिंग सीन्स दिला होता, तेव्हा त्याची स्थिती खूपच नाजूक झाली होती. सीन व्यवस्थित व्हावा म्हणून त्याने बºयाचदा रिटेकही घेतला. परंतु अशातही त्याला परफेक्ट सीन देता आला नाही. अखेर त्याने सेटवरून काढता पाय घेत रूम गाठली. मीदेखील त्याच्या पाठोपाठ रूममध्ये गेली. काही मिनिटे आम्ही एकमेकांकडे बघितले नव्हते. त्यानंतर अचानकच आमिरने मला म्हटले की, ‘आपण चेस खेळुया काय?’ मी त्याला लगेचच होकार दिला.

काही वेळानंतर सर्व वातावरण शांत झाले. आमिरनेदेखील किसिंग सीनला बगल दिली. कालांतराने चित्रपटातूनच हा सीन काढण्यात आला. या चित्रपटात पूजाने गेस्ट अपीयरेंस म्हणून काम केले होते. चित्रपटात तिने गंगा नावाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट दिलीप शंकर यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटात आमिरच्या अपोझिट अभिनेत्री जुही चावला होती. सुरुवातीला निर्मात्यांनी या चित्रपटात शाहरूख खान आणि रजनीकांत या जोडीला साइन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या दोघांचे डेट्स मिळत नसल्याने आमिर खानच्या नावाचा विचार केला गेला. पुढे जेव्हा जेव्हा आमिरवर किसिंग सीन देण्याचा प्रसंग ओढावला तेव्हा तेव्हा त्याची हालत नाजूक झाल्याचाही खुलासा पूजाने केला.

टॅग्स :आमिर खानपूजा बेदी