Join us

गर्लफ्रेंडसोबत आमिर खानने थिएटरमध्ये लावली हजेरी, 'सितारे जमीन पर'च्या स्क्रीनिंगदरम्यान काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:03 IST

'सितारे जमीन पर' सिनेमाचा शो सुरु होता. त्याचवेळी आमिर खानने थिएटरमध्ये हजेरी लावली. नंतर काय घडलं?

आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा २० जून रोजी रिलीज झाला. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक खूप गर्दी करत आहेत, असं दिसतंय. हा सिनेमा सुरुवातीपासून प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत होता. त्यामुळे सिनेमा जसा रिलीज झाला तसं प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केलेली दिसली. अशातच 'सितारे जमीन पर' पाहण्यासाठी थिएटरमध्ये असलेल्या प्रेक्षकांना भेटण्यासाठी आमिर खानने सिनेमातील कास्टसोबत हजेरी लावली. त्यावेळी काय घडलं?  जाणून घ्या

'सितारे जमीन पर'च्या स्क्रीनिंगवेळी आमिर आला अन्..

'सितारे जमीन पर' सिनेमाचं एका थिएटरमध्ये स्क्रीनिंग सुरु होतं. त्यावेळी आमिर त्या स्क्रीनिंगदरम्यान अचानक थिएटरमध्ये गेला. आमिरला पाहताच थिएटरमधील अनेक प्रेक्षक प्रचंड आनंदी झाले. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाट करुन आमिरचं खास स्वागत केलं. यावेळी आमिरसोबत सिनेमात काम करणारी मुलंही दिसली. आमिर खान आणि मुलांनी थिएटरमध्ये सरप्राइज एन्ट्री मारल्याने प्रेक्षकांच्या तिकिटाचे पैसे खऱ्या अर्थाने वसूल झाले. अनेकांची आमिरसोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली. अशाप्रकारे आमिरने त्याच्या एन्ट्रीने वातावरण प्रसन्न करुन टाकले. 

'सितारे जमीन पर'ची कमाई

 प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमिर खानचा नवा सिनेमा "सितारे जमीन पर" अखेर २० जून २०२५ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लासिक "तारे जमीन पर"चा स्पिरिचुअल सिक्वेल मानला जात असून, त्याची कथा प्रेरणादायक आणि हृदयस्पर्शी आहे.

चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी देशभरातून प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला असून, ₹ ११.७ कोटींचा जबरदस्त ओपनिंग डे कलेक्शन नोंदवण्यात आला आहे. या सिनेमात आमिर खानसोबत अभिनेत्री जिनिलिया देशमुख प्रमुख भूमिकेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या सिनेमाद्वारे १० नवोदित कलाकारांचे पदार्पण होत आहे. हे कलाकार म्हणजे – अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषि शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. 

टॅग्स :आमिर खानबॉलिवूडबॉक्स ऑफिस कलेक्शन