Join us

'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्यातील जोडीदार, पोस्ट शेअर करत म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 20:10 IST

Ashvini Mahangade : अश्विनी महांगडे हिने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिने साकारली आहे. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली आहे. तसेच नुकतीच ती महाराष्ट्र शाहीर सिनेमातही झळकली आहे. यातील तिच्या कामाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. अश्विनी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने एक खास पोस्ट शेअर करीत तिच्या आयुष्याचा जोडीदार कोण हे सर्वांना सांगितले आहे.

अश्विनी महांगडे हिने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. अश्विनीने चार फोटो एकत्र करून एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्यासोबत तिचा लाइफ पार्टनर दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, आधार देणाऱ्याचे मन निर्मळ असावे आणि ते अनेक संकटांमधून गेल्यावरच समजते…. अश्विनीच्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

अश्विनीला आधार देत कायम तिची साथ देणाऱ्या या तिच्या जोडीदाराचे नाव आहे निलेश जगदाळे. निलेश हे फार्मफ्रेश ऑरगॅनिक फ्रेशचे मालक आहेत. याबरोबरच त्यांनी अश्विनीसोबत मिळून ‘फ्लाइंग एन्जल लेट्स फ्लाय’ ही कंपनीदेखील सुरू केली आहे. तर ते ‘रयतेचे स्वराज्य’ प्रतिष्ठानचे सदस्यही आहेत. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाअश्विनी महांगडे