Join us  

'आहे त्या तशाच आहेत'; वर्षा उसगांवकरांसाठी मिलिंद गवळींची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 5:27 PM

Milind gawli:अलिकडेच त्यांनी लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चर्चेत येत असलेला लोकप्रिय कलाकार म्हणजे मिलिंद गवळी. एकेकाळी उत्तम अभिनय आणि चित्रपटांच्या जोरावर मिलिंद गवळी यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं होतं. विशेष म्हणजे रुपेरी पडदा गाजवल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला असून सध्या ते अनेक मालिकांमध्ये झळकत आहेत. यातलीच त्यांची सुपरहिट ठरलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते.

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर तुफान सक्रीय असलेले मिलिंद कायम नवनवीन पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. यात कधी मालिकेतील तर कधी वैयक्तिक जीवनातील अनुभवदेखील ते शेअर करतात. अलिकडेच त्यांनी लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

"प्रवाह पिक्चरच्या मुहूर्ताच्या प्रसंगी त्या सोहळ्याच्या वेळेला अनेक दिग्गज कलाकारांच्या भेटी झाल्या या सगळ्या महान कलाकारांबरोबर मला काम करायचं भाग्य मिळालं होतं. अशा प्रसंगी त्यांच्या भेटीगाठी होतात याचा फार मला आनंद होतो ,नाही तर एकदा एका कलाकाराबरोबर आपण काम केलं. तो चित्रपट किंवा ती सीरियल पूर्ण झाली की त्यानंतर किती वर्षांनी आमची भेट होईल याची काही शाश्वती नसते, सुलेखा तळवलकर बरोबर जेव्हा “ आई “चित्रपट केला नंतर जवळजवळ 22 वर्षानंतर आम्ही एकत्र “तु अशी जवळी रहा “ ही मालिका केली. अर्चना पाटकर “सुन लाडकी सासरची “मध्ये माझी आई होत्या,आता पंचवीस एक वर्षानंतर “आई कुठे काय करते “ या मालिकेत एकत्र काम करतोय, असं मिलिंद गवळी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "असे अनेक कलाकारांबरोबर वर्ष-वर्ष भेटी होत नाहीत काल वर्षाताईंबरोबर स्टार प्रवाहच्या event मध्ये माझा आणि त्यांचा फोटोशूट झाला, फोटो शूट करत असताना आठवलं की  2006 मध्ये आम्ही एकत्र @maheshtilekar यांच एक गाणं केलं होतं, त्यानंतर आम्ही सोळा सतरा वर्षे एकत्र कामच केलं नाही. मी selfie काढला लगेच, कारण परत किती वर्षांनी आम्ही भेटू माहित नाही. पण 16/ 17 वर्ष मी वर्षाताईंना बघतो आहे त्या तशाच आहेत . Very Graceful. त्यांना खूप खूप शुभेच्छा". 

टॅग्स :वर्षा उसगांवकरमिलिंद गवळीटेलिव्हिजनसेलिब्रिटी