Join us
Daily Top 2Weekly Top 5

आई कुठे काय करते मालिकेतल्या संजनाच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 18:53 IST

रुपाली भोसले तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असून तिच्या कुटुंबासह खास क्षणाचे फोटो शेअर करत असते.

'आई कुठे काय करते' मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांनाही फार उत्सुकता असते. रुपाली तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असून तिच्या कुटुंबासह खास क्षणाचे फोटो शेअर करत असते. 

रुपाली भोसले अंकित मगरेला डेट करत होती.  अंकित रूपालीचा पीआर होता. बिग बॉस मराठी  शोमध्ये सभागी होण्या आधीसुद्धा अंकित मगरेची पीआर कंपनी रूपालीचा पीआर मॅनेज करत होती. त्यानंतर रूपाली बिग बॉसमध्ये गेल्यावर सुद्धा या कंपनीने तिच्या पीआरची जबाबदारी पाहिली होती. दोघांचे प्रोफेशनल रिलेशनशिप कधी पर्सनल झाले त्यांच त्यांनाच कळालं नाही.रूपाली आणि अंकित यांनी आपल्या नात्याची जाहिररित्या कबुली दिली होती. 

अनेकदा दोघेही एकमेकांसह फोटोशेअर करताना दिसायचे. यातून चाहत्यांनाही त्यांच्यामध्ये सुरु असलेल्या केमिस्ट्रीचा अंदाज आला होता. त्यामुळे फोटोवरुन दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे चाहत्यांना माहिती झाले होते. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री आहे. लॉकडाऊन काळात दोघांनीही गुपचूप लग्न उरकल्याचेही बोलले जाते.

लग्नाचे फोटो समोर आले नसले तरीही, सोशल मीडियावर रुपालीने अंकितसोबत शेअर केलेल्या फोटोंमुळे दोघांनीही लग्न उरकल्याचे  तर्कवितर्क लावले गेले होते. रुपालीने गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू भरल्याने तिने लग्न केल्याचे समोर आले होते. 

रुपालीचं अंकितसोबत हे दुसरे लग्न आहे. २०१२ मध्ये रुपालीने  लंडनमधील एका बिझनेसमनसोबत लग्न केले होते. मात्र काही काळानंतर दोघांच्या नात्यात कटुता निर्माण झाली आणि लग्नाच्या ७ वर्षानंतर घटस्फोट घेत ती भारतात परतली होती. बिग बॉस मराठी शोमध्ये सहभागी झाली होती तेव्हा अनेकवेळा तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना ती दिसली होती. 

टॅग्स :रुपाली भोसले