प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रार्थना सोशल मीडियावर सक्रीय असते आणि चाहत्यांना या माध्यमातून अपडेट देत असते. दरम्यान तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या भावाचं निधन झालं आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
प्रार्थना बेहरेने भावासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, लव्ह यू पिंटू. तुझी आठवण कायम येत राहील. तू अचानक दूर गेलास. आपण एकमेकांना गुडबायदेखील केले नाही. पण भाऊ कधीही वेगळे होऊ शकत नाहीत, मौल्यवान आठवणी कधीच मरत नाहीत. तुझ्या आत्म्याला शांती मिळो. पुढच्या आयुष्यात आपण एकमेकांना भेटू. तुझी खूप आठवण येईल.
वर्कफ्रंटप्रार्थना बेहरे शेवटची बाई गं या सिनेमात झळकली. या सिनेमात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेतून तिलाला पहिला ब्रेक मिळाला होता. या मालिकेत तिने वैशाली ही भूमिका साकारली होती. पहिल्याच मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेनंतर प्रार्थनाची अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले. 'कॉफी आणि बरंच काही', 'मितवा', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'फुगे', 'व्हॉट्स अप लग्न', 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' अशा अनेक चित्रपटात प्रार्थना मुख्य भूमिकेत दिसली.