Join us

OMG! 8 तास रांगेत उभी होती 90 च्या दशकातील ही सुपरहिट हिरोईन, कुणी ओळखलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 13:48 IST

नव्वदच्या दशकात एका अभिनेत्रीने प्रेक्षकांना वेड लावले होते. पण आज या अभिनेत्रीचा चेहरा लोक साफ विसरले.

ठळक मुद्देमिनाक्षीने फिल्म इंडस्ट्रीला जरी रामराम ठोकला असला तरीदेखील ती आपली नृत्याची आवड जोपासत आहे.

नव्वदच्या दशकात एका अभिनेत्रीने प्रेक्षकांना वेड लावले होते. पण आज याच अभिनेत्रीचा चेहरा लोक साफ विसरले. विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री हिच्याबद्दल.मिनाक्षी शेषाद्री 90 च्या दशकातील एक सुपरहिट हिरोईन होती. आपल्या अदाकारी आणि सौंदर्याच्या बळावर तिने अफाट लोकप्रियता मिळवली. पण लग्नानंतर मिनाक्षीने बॉलिवूडला रामराम ठोकला. अर्थात सोशल मीडियावर आजही ती अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या मिनाक्षीचे एक ट्वीटचर्चेचा विषय बनले आहे.

 

होय, ट्वीटरवरील पोस्टमध्ये मिनाक्षीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी रांगेत उभी दिसतेय. ‘आठ तासांपासून मी रांगेत उभी आहे. पण कुणीच मला ओळखले नाही. ही आहे अमेरिका’ असे या फोटोसोबत तिने लिहिले आहे.

आणखी एक फोटोही तिने शेअर केला आहे. यात मिनाक्षी तिचा नंबर येण्याची प्रतीक्षा करताना दिसतेय.मिनाक्षी सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. 1995 मध्ये मिनाक्षीने अमेरिकेत राहणारा इनव्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केले. विशेष म्हणजे, लग्नाची बातमी तिने बराच काळ दडवून ठेवली.

लग्नानंतरही ती चित्रपटात काम करत राहिली. पण अखेर मिनाक्षीच्या लग्नाचा खुलासा झाला आणि यानंतर मिनाक्षीने अचानक बॉलिवूड सोडून पतीसोबत परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती कधीही चित्रपटात दिसली नाही.

गेल्या काही वर्षांत मिनाक्षी कमालीची बदलली आहे. इतकी की, तिला ओळखणेही कठीण आहे. मिनाक्षीला एक मुलगा व एक मुलगी आहे.

मिनाक्षीने फिल्म इंडस्ट्रीला जरी रामराम ठोकला असला तरीदेखील ती आपली नृत्याची आवड जोपासत आहे. टेक्सासमध्ये स्थायिक झालेल्या मिनाक्षीने तेथे कथ्थक अकादमी उघडली असून तरुणींना नृत्याचे धडे देते.

2015 मध्ये ऋषी कपूर यांनी मिनाक्षीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत मिनाक्षीला ओळखणे कठीण झाले होते. खुद्द ऋषी कपूर यांनी सुरुवातीला मिनाक्षीला ओळखले नव्हते. मिनाक्षीला इतके बदललेले बघून त्यांनाही धक्का बसला होता.

टॅग्स :मिनाक्षी शेषाद्री