Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री रेखा यांनी सांगितली ६४ वर्षांपूर्वीची ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 18:06 IST

यंदाचा लक्स गोल्डन रोझ पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून या सोहळ्याला बॉलिवूडमधील सर्व नामवंत तारे तारकांनी हजेरी लावली होती.

यंदाचा लक्स गोल्डन रोझ पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून या सोहळ्याला बॉलिवूडमधील सर्व नामवंत तारे तारकांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे सूत्रसंचालन चक्क किंग खान म्हणजेच शाहरूख खानने केले होते. आपल्या नर्म विनोदी टिप्पणीने शाहरूखने उपस्थितांमध्ये हास्याची खसखस पिकविली. हा सोहळा अभिनेत्री रेखासाठी विशेष महत्त्वाचा होता कारण त्यात तिला ‘लक्स गोल्डन रोझ लेजंडरी ब्युटी’ हा पुरस्कार प्रदान करण्यात  आला होता. बॉलिवूडची ज्येष्ठ सौंदर्यवती अभिनेत्री रेखाला हा पुरस्कार शाहरूख खान आणि निर्माता करण जोहर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

यानंतर केलेल्या भाषणात रेखा म्हणाली, “सौंदर्य हे तुमच्या व्यक्तिमत्त्वात असते, असा माझा विश्वास आहे. माझ्यावर इतकी वर्ष प्रेम केल्याबद्दल तसेच हे सौंदर्य बहाल केल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. ज्या वर्षी माझा जन्म झाला, त्याच वर्षी माझ्या आईने लक्ससाठी मॉडेल म्हणून काम केले होते आणि आता या घटनेला ६४ वर्ष झाली आहेत. हा पुरस्कार दिल्याबद्दल मी आभारी असून लक्सबरोबरचे माझे नाते निरंतर सुरू राहील, अशी मी आशा करते.”

बॉलीवूडमधील नामवंत कलाकार ‘लक्स गोल्डन रोझ पुरस्कार’ या सोहळ्यात कार्यक्रम सादर करणार असल्याने हा सोहळा ही प्रेक्षकांसाठी नेत्रपर्वणीच ठरेल. ‘लक्स गोल्डन रोझ पुरस्कार सोहळा’ लवकरच स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :रेखा