Join us

संस्कृती बालगुडेच्या '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' सिनेमात १४ नव्या कलाकारांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 19:29 IST

अभिनेत्री संस्कृती बालगुडे लवकरच '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संस्कृती बालगुडे लवकरच '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी'  या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा आगळ्यावेगळ्या नावामुळे चर्चेत आला होता. त्यानंतर हा चित्रपट आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. तब्बल १४ नव्या कलाकारांना या चित्रपटातून संधी मिळाली आहे.  

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचे निर्माते आहेत तर  सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे . चित्रपटाची पटकथा शर्वाणी पिल्लई आणि सुश्रुत भागवत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत. 

दिग्दर्शक सुश्रुत भागवत म्हणाले, की '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी विशेष ठरणार आहे. चित्रपटाचा विषय खास आणि महत्त्वाचा आहेच, पण १४ नवीन कलाकार ही देखील विशेष बाब आहे. या १४ नव्या कलाकारांच्या भूमिकाही नक्कीच महत्वपूर्ण आहेत.चित्रपटाचे चित्रीकरण हे नुकतेच पूर्ण झाले असून आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :संस्कृती बालगुडेसंजय मोने