२०२४ हे वर्ष बॉलिवूड, तामिळ, मल्याळम, तेलुगु सिनेमांनी चांगलं यश मिळवलं. २०२४ मध्ये कोणत्या सिनेमांनी प्रेक्षकांचा मनाचा ठाव घेतला. त्याची यादी पुढीलप्रमाणे
१) स्त्री २
गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या भारतीय सिनेमांमध्ये 'स्त्री २' सिनेमा अव्वल स्थानावर आहे. हा सिनेमा २०२४ मधील बॉलिवूडचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. या सिनेमात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांनी भूमिका साकारली होती.
२) कल्की २८९८ एडी
'कल्की २८९८ एडी' हा सिनेमा २०२४ मधील सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सिनेमांमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण या कलाकारांनी सिनेमात प्रमुख भूमिका साकारली. नाग अश्विन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आधुनिक काळातील कथेचं महाभारताशी कनेक्शन दाखवल्याने हा सिनेमा चर्चेचा विषय होता.
३) १२th फेल
२०२३ साली रिलीज झालेला '१२th फेल' सिनेमा २०२४ मध्येही सर्वाधिक सर्च लिस्टमध्ये होता. हा सिनेमा माउथ पब्लिसिटीच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. अशातच काही दिवसांपूर्वी '१२th फेल'मधील मुुख्य अभिनेता विक्रांत मेस्सीने अभिनयातून ब्रेक घेणार असल्याची घोषणा केल्याने हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या सर्च लिस्टमध्ये आला.
४) लापता लेडीज
१ मार्च २०२४ साली रिलीज झालेला 'लापता लेडीज' सिनेमा प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. सिनेमाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळाला. पण नंतर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा रिलीज झाल्यावर 'लापता लेडीज'ची आणखी चर्चा झाली. अशातच भारतातर्फे 'लापता लेडीज' हा सिनेमा ऑस्करला पाठवला गेला. किरण रावने सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आमिर खान सिनेमाचा निर्माता होता.
५) Hanu-Man
Hanu-Man हा २०२४ मध्ये आलेला एक वैशिष्ट्यपूर्ण सिनेमा. Hanu-Man हा तेलुगु भाषेतला सिनेमा या वर्षात चर्चेत राहिला. Hanu-Man सिनेमाला पौराणिक कथेची जोड दिल्याने हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. प्रशांत वर्मा दिग्दर्शित Hanu-Man च्या दुसऱ्या भागात ऋषभ शेट्टी प्रमुख भूमिकेत आहे.
६) महाराजा
विजय सेतुपतीचा 'महाराजा' सिनेमा यावर्षी सर्वाधिक चर्चेत राहिला. विजय सेतुपतीचा अभिनय, अनुराग कश्यपने रंगवलेला खलनायक आणि शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारं सिनेमाचं कथानक अशा गोष्टींमुळे महाराजा सिनेमा चर्चेत राहिला. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा उपलब्ध आहे.
७) मंजुमल बॉइज
मंजुमल बॉइज हा मल्याळम भाषेतील सिनेमा यावर्षी सुपरहिट झाला. या सिनेमात कोणीही लोकप्रिय अभिनेते नव्हते तरीही हा सिनेमा सुपरहिट ठरला. हा सिनेमा मल्याळम सिनेमातील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून ओळखला गेला.
८) द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम
थलापती विजयचा द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा सिनेमा २०२४ साली रिलीज झालेला. या सिनेमात थलापती विजयची प्रमुख भूमिकेत होती. विशेष म्हणजे या सिनेमात थलापती विजयचा डबल रोल होता. या सिनेमात प्रभूदेवा, मीनाक्षी चौधरीची प्रमुख भूमिका होती.
९) सालार
प्रभासची प्रमुख भूमिका असलेला सालार सिनेमा २०२४ मध्ये चर्चेत राहिला. या सिनेमात प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन या कलाकारांची प्रमुख भूमिका होती. याशिवाय अभिनेत्री श्रिया रेड्डी. श्रृती हासनही सिनेमात झळकलेली. या सिनेमाचा पुढील भाग लवकरच भेटीला येणार आहे.
१०) आवेशम
फहाद फासिलची प्रमुख भूमिका असलेला 'आवेशम' सिनेमा २०२४ मध्ये चांगलाच गाजला. या सिनेमात फहाद फासिल मुख्य भूमिकेत होता. आगळंवेगळं कथानक आणि जोशपूर्ण गाण्यांमुळे आवेशम सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला