काय आहे Masked Aadhaar Card?, जाणून घ्या फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 03:17 PM2021-10-16T15:17:08+5:302021-10-16T15:18:12+5:30

Masked Aadhaar card : आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट असल्यामुळे त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे.

What is Masked Aadhaar card? How to download Masked Aadhaar card | काय आहे Masked Aadhaar Card?, जाणून घ्या फायदे...

काय आहे Masked Aadhaar Card?, जाणून घ्या फायदे...

Next

नवी दिल्ली : आजकाल प्रत्येक सरकारी कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डला ओळख पुरावा म्हणून सर्वात जास्त ग्राह्य धरले जाते. बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा पासपोर्ट काढण्यासाठी, कोणत्याही सरकारी योजनेचा किंवा अन्य कामाचा लाभ घेण्यासाठी फक्त आधार कार्ड आवश्यक आहे. (What is Masked Aadhaar card? How to download Masked Aadhaar card)

आधार कार्डवर 12 अंकांचा एक युनिक नंबर आहे. या 12 अंकांमध्ये कार्डधारकाच्या ओळखीची संपूर्ण कुंडली नोंदवली आहे. आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट असल्यामुळे त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे. याचबरोबर, आता मास्क्ड आधार कार्ड येऊ लागले आहे. तुमचे सुरुवातीचे 8 नंबर मास्क्ड आधार कार्डमध्ये लपलेले आहेत. सुरूवातीच्या या नंबरवर 'xxxx-xxxx'असे क्रॉस चिन्ह देण्यात आले आहे. तर उर्वरित शेवटचे 4 नंबर दिसतात.

मास्क्ड आधार कार्डचा फायदा असा आहे की, जरी तुमचे आधार कार्ड हरवले तर त्याचा गैरवापर अज्ञात व्यक्ती करू शकणार नाही. तसेच, तुम्ही तुमचे जुने आधार कार्ड मास्क्ड आधार कार्डमध्ये रूपांतरित करू शकता. हे काम ऑनलाईन सहज करता येते. याचबरोबर, eaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटवर लॉगइन करुन तुम्ही नियमित आणि मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करु शकता.

आधार कार्ड डाऊनलोड कसे कराल?
- सर्वात आधी eaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटवर जा.
- वेबसाइटवर गेल्यानंतर आपला 12 अंकी आधार क्रमांक टाका.
- तुम्हाला मास्क्ड आधार कार्ड हवे असल्यास तसा ऑप्शन निवडावा.
- स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाईप करावा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी स्क्रीनवर टाकून सबमिट करावा.
- ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आधार कार्डाचा तपशील आणि डाऊनलोड करण्याचे पर्याय दिसतील.

कशी कराल आधार कार्डाची पडताळणी?
- सर्वप्रथम uidai.gov.in/verify या थेट लिंकवर लॉगिन करा.
- पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
- त्यानंतर कॅप्चा कोड टाका.
- यानंतर व्हेरिफाई बटणावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक योग्य असल्याचा एक मेसेज पेजवर डिस्प्ले होईल. त्यामध्ये नमूद केलेल्या आधार क्रमांकाची पडताळणी करुन घ्या.
- तुमचा खासगी तपशीलही या पेजवर दिसेल.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?
– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.
– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.
– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.
– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

Web Title: What is Masked Aadhaar card? How to download Masked Aadhaar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app