Vehicle sector in the recession, one lakh jobs lost | वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत, एक लाख रोजगार बुडाले
वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत, एक लाख रोजगार बुडाले

नवी दिल्लीः देशातलं वाहन क्षेत्र पुन्हा एकदा मंदीच्या गर्तेत अडकलं आहे. सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे वाहन क्षेत्रात एक लाख रोजगार बुडाले आहेत. या मंदीचा परिणाम वाहनाच्या भागांची निर्मित करणारे उद्योग आणि त्यासंबंधित रोजगारही पडला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एप्रिल-सप्टेंबरमध्ये ऑटो पार्ट्स क्षेत्राच्या व्यवसायात 10.1 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. तसेच 1.99 लाख कोटी रुपयांनी घसरून व्यवसाय 1.79 लाख कोटींवर आला आहे. जुलैपासून आतापर्यंत अनेकांचे रोजगार गेले आहेत. वाहन उपकरणांचा उद्योग मंदीनं प्रभावित झालेला आहे. 

ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादन असोसिएशन(एक्मा)चे अध्यक्ष दीपक जैन म्हणाले, वाहन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी आहे. त्यामुळेच वाहन क्षेत्रातल्या गुंतवणुकीत दोन अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वच श्रेणीतल्या वाहनांची विक्री मंदावलेली आहे. त्यामुळे याचा रोजगारावर परिणाम होत आहे. वाहन उपकरणांचा उद्योग हा वाहनांच्या विक्रीवर अवलंबून असतो. 
सद्यस्थितीत वाहनांच्या उत्पादनात 15-20 टक्के कपात नोंदवली गेली असून, वाहन उपकरणांचा व्यवसाय प्रभावित झालेला आहे. गेल्या ऑक्टोबरपासून मंदीचं सावट आहे. त्यामुळे जास्त करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा नोकऱ्या गेल्या आहेत.  

जीएसटीचा दर 18 टक्के करण्याची मागणी
ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादन असोसिएशन(एक्मा)नं जुलैमध्ये वाहन उद्योग क्षेत्रातील जीएसटीचा दर एकसमान म्हणजेच 18 टक्के करण्याचा प्रस्ताव दिला होता, जेणेकरून वाहन उद्योगाला पुन्हा उभारी घेण्यासाठी 10 लाख नोकऱ्या वाचण्यासाठी मदत मिळणार आहे. वाहन उपकरणांचा उद्योग 50 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. एक्माच्या मते, वाहन उद्योग अभूतपूर्व मंदीतून जात आहे.   
सद्यस्थितीत वाहन उत्पादनांत 15-20 टक्क्यांची कपात आल्यानं वाहन उपकरणांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. अशी परिस्थिती राहिल्यास 10 लाख बेरोजगार होऊ शकतात. काही कंपन्यांमधून नोकरीतून काढून टाकण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.  

BS4वरून BS6च्या बदलीवर प्रभाव
जीएसटी प्रणालीअंतर्गत 70 टक्के वाहन उपकरणांवर 18 जीएसटी लावला जातो. ऊर्वरित 30 टक्क्यांवर 28 टक्के जीएसटी लागतो. तसेच 28 टक्के जीएसटीबरोबरच वाहनांची लांबी, इंजिनाचा आकारासह वाहनांवर 15 टक्के उपकरही लावला जातो.  
 

Web Title: Vehicle sector in the recession, one lakh jobs lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.