Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?

अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?

US China Agreement : दोन्ही देशांनी एकमेकांवर लादलेल्या आयात शुल्कात सुमारे ११५ टक्के कपात करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:57 IST2025-05-12T14:41:43+5:302025-05-12T14:57:54+5:30

US China Agreement : दोन्ही देशांनी एकमेकांवर लादलेल्या आयात शुल्कात सुमारे ११५ टक्के कपात करण्यात आली आहे.

united states and china agree to bring down reciprocal tariffs by 115 percent for 90 days | अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?

अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?

US China Agreement on Tariffs: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने व्यापारी युद्धाचा भडका उडाला होता. विशेषकरुन चीन आणि अमेरिकेतील तणावामुळे अनेक देश चिंतेत होते. सोमवारी अखेर या युद्धाला पूर्णविराम मिळाला. जिनेव्हा येथे झालेल्या २ दिवसांच्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी या करारावर शिक्कामोर्तब केले. जगातील २ आर्थिक शक्तींनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात असे म्हटले आहे की सध्याच्या शुल्कात ९० दिवसांचा ब्रेक लावण्यात आला आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट म्हणाले की, दोन्ही देशांनी काही अटींवर टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयात शुल्कात किती कपात?
अमेरिकेने चीनवर टॅरिफ लादल्यानंतर चीननेही जशास तसे उत्तर देत तेवढेच आयात शुल्क लादले होते. आता करारानुसार, दोन्ही देशांनी एकमेकांवर लादलेले शुल्क सुमारे ११५ टक्क्यांनी कमी केले आहे. या ९० दिवसांत, चिनी वस्तूंवरील अमेरिकेचा कर १४५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल. दुसरीकडे, चीन देखील अशाच प्रकारे अमेरिकन वस्तूंवरील आयात शुल्क १२५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करेल.

चीन आणि अमेरिका यांचे टॅरिफ कपातीवर शिक्कामोर्तब
बेझंट यांनी चिनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेचे वर्णन अतिशय सकारात्मक केले. दोन्ही देश एकमेकांचा आदर करतात यावर भर दिला. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर म्हणाले की केवळ २ दिवसांच्या बैठकीत आम्ही या निर्णयापर्यंत पोहचलो आहे. याचा अर्थ आमच्यात जास्त मतभेद नव्हते.

वाचा - पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा

भारतावरचाही टॅरिफ कमी होणार?
भारत अमेरिकेसोबत व्यापार चर्चाही करत आहे. आर्थिक आघाडीवर धक्का बसण्याची भीती आणि भारताला होणारे फायदे यांच्यात, चीन आणि अमेरिका यांच्यातील या व्यापार करारामुळे आर्थिक आघाडीवर बीजिंगला दिलासा मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.

Web Title: united states and china agree to bring down reciprocal tariffs by 115 percent for 90 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.