Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?

ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?

Trump Tariff New: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगातील अनेक देशांवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली होती. यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:55 IST2025-05-15T11:54:44+5:302025-05-15T11:55:38+5:30

Trump Tariff New: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगातील अनेक देशांवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली होती. यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली.

trump s tariffs imposed us treasury recorded largest budget surplus since 2021 in apri 2025 | ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?

ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?

Trump Tariff New: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगातील अनेक देशांवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली होती. यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. अखेर ट्रम्प सरकारनं ९० दिवसांचा दिलासा दिला. पण हे शुल्क लागू होण्यापूर्वीच त्याचा परिणाम अमेरिकेच्या तिजोरीवर दिसू लागला आहे. एप्रिलमध्ये ट्रेजरी विभागाचा बजेट सरप्लस २५८ अब्ज डॉलर होता, जो २०२१ नंतरचा सर्वाधिक आहे. या कालावधीत सरकारला ८५० अब्ज डॉलर्सचा महसूल मिळाला, तर सरकारी खर्च ५९२ अब्ज डॉलर्स होता.

पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?

अमेरिकन सरकारच्या महसुलात वाढ होण्याचं कारण वैयक्तिक कर भरणं हे होतं. यातून एप्रिलमध्ये सरकारला ४६० अब्ज डॉलर्स मिळाले, जे गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १६ टक्के अधिक आहे. त्याचप्रमाणे ट्रेजरी विभागाला कस्टम ड्युटीपोटी विक्रमी १६ अब्ज डॉलर्स मिळाले, जे मागील वर्षाच्या तुलनेत ९ अब्ज डॉलर्सनं अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सात महिन्यांत अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट १९४ अब्ज डॉलरनं वाढून १.०५ ट्रिलियन डॉलर्स झाली आहे. अमेरिकेच्या इतिहासातील ही तिसरी सर्वात मोठी तूट आहे.

मंदीची भीती

अमेरिकेची अर्थव्यवस्था अद्याप मंदीला तोंड देण्याच्या स्थितीत नाही. मंदीच्या काळात अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट जीडीपीच्या सरासरी ४ टक्के राहिली आहे. या वर्षी मंदी आली तर अमेरिकेच्या तिजोरीला १.३ ट्रिलियन डॉलरचं नुकसान होऊ शकतं. याचं कारण मंदी आली तर दीर्घकालीन व्याजदरात घसरण होऊ शकते. व्याजदरात पुढील दोन टक्के घट झाल्यास वार्षिक व्याज देयकात ५६८ अब्ज अमेरिकन डॉलरची बचत होईल.

Web Title: trump s tariffs imposed us treasury recorded largest budget surplus since 2021 in apri 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.