Tata Group gets new Parliament building contract, Rs 862 crore in delhi | टाटा ग्रुप्सला मिळालं नव्या 'संसद भवनाचं' कंत्राट, एवढ्या कोटीत उभारणार इमारत

टाटा ग्रुप्सला मिळालं नव्या 'संसद भवनाचं' कंत्राट, एवढ्या कोटीत उभारणार इमारत

ठळक मुद्देसंसद भवनच्या नवीन इमारतीमध्ये काही मिनारच्या आकृतींचा समावेश करण्याचे बोलले जात होते. मात्र, देशाचा गौरव असललेल्या अशोक स्तंभाला अंतिम मान्यता मिळाली आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकार संसदेची नवी इमारत उभारणार असून त्यासाठी टाटा ग्रुपला ठेका मिळाला आहे. टाटा ग्रुपला नवीन संसद इमारतीच्या उभारणीचे कंत्राट 861.9 कोटी रुपयांना मिळाले आहे. संसद भवन उभारण्यासाठी सुरु असलेल्या कंत्राटदारांच्या स्पर्धेत 7 कंपन्यांची नावे आघाडीवर होती. मात्र, या स्पर्धेत टाटाने बाजी मारत संसद भवन उभारणीचं काम मिळवलं आहे. 

टाटा प्रोजेक्ट लिमिटेड, लार्सन एंड टूब्रो लिमिटेड, आईटीडी सीमेंटेशन इंडिया लिमिटेड, एनसीसी लिमिटेड, शपूरजी पलोनजी अँड कंपनी प्राइवेट लिमिटेड, उत्तर प्रदेश राजकीय निर्माण निगम लिमिटेड आणि पीएसपी प्रोजेक्ट्स लिमिटेड या 7 कंपन्यांनी संसद भवनच्या इमारतीचे कंत्राट मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, सरतेशेवटी सर्वात कमी बोली लावल्यामुळे टाटा ग्रुपला हे कंत्राट देण्यात आलं आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनातच या नवीन इमारतीच्या पायाभरणीला सुरुवात होईल, असे सांगण्यात येत आहे. 

संसद भवनच्या नवीन इमारतीमध्ये काही मिनारच्या आकृतींचा समावेश करण्याचे बोलले जात होते. मात्र, देशाचा गौरव असललेल्या अशोक स्तंभाला अंतिम मान्यता मिळाली आहे. त्यामुळे, या इमारतीमध्ये अशोक स्तंभ दिसणार आहे. सध्याच्या संसदेच्या इमारतीसमोरच नवीन इमारत दिमाखात उभी राहणार आहे. 

21 महिन्यांत काम पूर्ण होणार 

नवीन संसद भवनच्या निर्मित्तीसाठी 21 महिन्यांचा कालावधी अंदाजे सांगण्यात आला आहे. त्यानुसार, या इमारतीच्या उभारणीसाठी 889 कोटी रुपयांचा खर्च येणार असे सांगण्यात येत होते. मात्र, टाटा ग्रुप्सने या इमारतीचा ठेका 862 कोटी रुपयांत घेतला आहे. त्यामुळे, आता या इमारतीवर 862 कोटी रुपये खर्च होणार आहेत. सेंट्रल विस्टा पुनर्विकास योजनेंतर्गत हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tata Group gets new Parliament building contract, Rs 862 crore in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.