Lokmat Money > बिझनेस न्यूज > Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या

Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या

Swiggy Q4 Results: फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं आपल्या आर्थिक वर्ष २०२५ चे मार्च तिमाहीचे निकाल शुक्रवारी जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:45 IST2025-05-10T14:45:24+5:302025-05-10T14:45:24+5:30

Swiggy Q4 Results: फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं आपल्या आर्थिक वर्ष २०२५ चे मार्च तिमाहीचे निकाल शुक्रवारी जाहीर केले.

Swiggy Q4 Results Instamart becomes a headache for Swiggy loss of thousands of crores know details | Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या

Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या

Swiggy Q4 Results: फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं आपल्या आर्थिक वर्ष २०२५ चे मार्च तिमाहीचे निकाल शुक्रवारी जाहीर केले. या वर्षी मार्च तिमाहीत स्विगी कंपनीला १०८१ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला. गेल्या वर्षी मार्च तिमाहीत कंपनीला ५५४ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला. मार्च तिमाहीत झपाट्यानं मोठ्या तोट्यात जाण्यामागं कंपनीचे प्रमुख कारण म्हणजे क्विक कॉमर्स डिलिव्हरी बिझनेस इन्स्टामार्टमध्ये कंपनीने केलेला मोठा खर्च असल्याचं मानलं जात आहे.

महसुलाच्या आघाडीवर स्विगी लिमिटेडनं वार्षिक आधारावर ४५ टक्क्यांनी वाढ नोंदवून ४४१० कोटी रुपयांची कमाई केली. स्विगीचा शेअर शुक्रवारी शेअर बाजाराच्या तुलनेत ०.६७ टक्क्यांनी घसरून ३१३ रुपयांवर बंद झाला. मार्च तिमाहीत ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू ४० टक्क्यांनी वाढून १२८८८ कोटी रुपये झाली आहे. स्विगीच्या सर्व बिझनेस वर्टिकल्समधील स्टोन ग्रोथमुळे ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यूमध्ये ही जोरदार वाढ झाली आहे.

स्विगीनं दिलेल्या माहितीनुसार, मार्च तिमाहीत त्याचा कन्सोलिडेटेड अॅडजस्टेड एबिटडा तोटा ७३२ कोटी रुपयांच्या पातळीवर नोंदविला गेला. याचं कारण इन्स्टामार्टमधील गुंतवणूक असल्याचं मानलं जातं. स्विगी ही क्विक कॉमर्स सेगमेंटमध्ये इन्स्टामार्टद्वारे आपला व्यवसाय करत आहेत, सध्या या सेगमेंटची ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू वार्षिक १०१ टक्क्यांनी वाढवून ४६७० कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या आठ तिमाहीत जोडलेल्या एकूण डार्क स्टोअर्सपेक्षा ही संख्या अधिक असून, कंपनीनं १२४ हून अधिक शहरांमध्ये आपली सेवा वाढवली आहे.

Web Title: Swiggy Q4 Results Instamart becomes a headache for Swiggy loss of thousands of crores know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.