PSU Stocks Crash: : क्वॉलिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट मार्गानं निधी उभारणीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करणाऱ्या चार सरकारी बँकांपैकी तीन बँकांच्या शेअर्सचा विक्रीचा सपाटा सुरुच आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये बुधवारी, २ एप्रिल रोजी ९.५ टक्क्यांची घसरण झाली. मंगळवारी तो ३.४ टक्के आणि गेल्या शुक्रवारी २.७ टक्क्यांनी घसरला होता.
शेअरमध्ये किती घसरण झाली?
पंजाब अँड सिंध बँकेचा शेअर मंगळवारी २० टक्क्यांनी घसरला आणि बुधवारी ६.२५ टक्क्यांनी घसरला. गेल्या शुक्रवारीही त्यात २.५ टक्क्यांची घसरण झाली होती. गेल्या आठवड्यात क्यूआयपीच्या माध्यमातून निधी गोळा करणारी आणखी एक पीएसयू बँक इंडियन ओव्हरसीज बँकेचा शेअर बुधवारी आणखी ४.५ टक्क्यांनी घसरला आणि सलग सहाव्या सत्रात त्यात घसरण दिसून आली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शेअर ९.५ टक्क्यांनी घसरून ३७.४ रुपयांवर तर पंजाब अँड सिंध बँकेचा शेअर ६.५ टक्क्यांनी घसरून ३२.५५ रुपयांवर आला. इंडियन ओव्हरसीज बँकेचा शेअर ४.४ टक्क्यांनी घसरून ३६.०३ रुपयांवर व्यवहार करत होता.
अधिक माहिती काय?
विशेष म्हणजे पंजाब अँड सिंध बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियानंही निधी उभारणीचा एक भाग म्हणून आपल्या सहकारी सरकारी बँकांना शेअर्स जारी केले आहेत. पंजाब अँड सिंध बँकेनं सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेला शेअर्स दिलेत, तर सेंट्रल बँक ऑफ इंडियानं पीएनबी, कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदाला शेअर्स दिले आहेत. चार पीएसयू बँकांनी मिनिमम पब्लिक शेअरहोल्डिंग (एमपीएस) निकषांचं पालन करून सरकारी भागभांडवल कमी करण्यासाठी निधी उभारणीची ही प्रक्रिया सुरू केली आहे. या चारही बँकांमध्ये सरकारचा ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)