प्रसाद गो. जोशी: नवीन वर्षाच्या पहिल्या दोन दिवसांत मुंबई शेअर बाजाराने आधीचा सर्व तोटा बाजारात भरून काढल्याने बाजारात उत्साह संचारला आहे. सन २०२६ मध्ये बाजार चांगला परतावा देईल असे वातावरण दिसून येत आहे. बाजाराने वर्षाचा प्रारंभ आशादायक वातावरणात केला. परकीय वित्तसंस्थांनी मात्र विक्रीचा मारा सुरूच ठेवला आहे. त्यांनी बाजारातून ७,६०८ कोटी रुपये काढले आहेत.
व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या कारवाईचा परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
विक्रीचा मारा सुरूच
गतवर्षामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारात विक्रीचाच जोर कायम ठेवला. या संस्थांनी भारतीय भांडवली बाजारांमधून २.९२ लाख कोटी रुपये काढून घेतले.
